जळगाव मिरर | २९ जानेवारी २०२४
जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघाताची मालिका नियमित सुरु असतांना नुकतेच दि.२७ जानेवारी रोजी जळगाव तालुक्यातील वावडदा गावाजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये कारमधील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. याप्रकरणी धडक देणाऱ्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मुक्ताईनगरात धनराज नारायण पाटील (वय ६२) हे वृद्ध आपल्या कुटुंबियांसह वात्तस्तव्यास आहे. ते पत्नीसोबत (एमएच १९ सीयू ११६७) क्रमांकाच्या कारने जळगावकडून पाचोऱ्याकडे जाण्यासाठी निघाले. यावेळी समोरुन (एमएच १४ ईयू ९४४४) क्रमांकाची कार विरुद्ध दिशेने पाचोऱ्याकडून वावडदाकडे येत होती. यावेळी भरधाव कारने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन धडक देणाऱ्या कारचालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.