जळगाव मिरर | २५ जानेवारी २०२४
जळगाव शहरातील आशाबाबा नगर परिसरात एका ३६ वर्षीय तरुण घरून जेवण करून येत असतांना तरुणाची दुचाकी दुभाजकावर आदळल्याने गणेश प्रकाश पाटील (वय ३६) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शिवकॉलनी उड्डाणपुलावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आशाबाबा नगरात गणेश पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांच्याकडे आयशर ही मालवाहू वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी सायंकाळी त्यांनी कर्नाटक जाण्यासाठी कंपनीतून मालाची गाडी भरली आणि ते जेवणासाठी घरी आले. जेवण आटोवून रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ते (एमएच १९ बीएन ८३९०) क्रमांकाच्या दुचाकीने गाडी लावलेल्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. शिवकॉलनीजवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन जात असतांना त्यांची दुचाकी दुभाजकावर आदळली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी गणेश यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.
अपघातात गणेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. यावेळी पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. त्यानंतर घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली.