
जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे या विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात देखील जिल्हाप्रमुख असलेले विष्णू भंगाळे यांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार यावर चर्चा सुरू झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे गेल्या अनेक वर्षापासून आमदार राहिले आहे मात्र अचानक एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील सर्वच आमदार शिंदेंच्या तंबूत जाऊन बसले त्यानंतर जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाकडे एकही आमदार नाही. आता जिल्हाप्रमुख भंगाळे यांनी देखील पक्षाची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी दोन नावांची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. यात जळगाव शहराचे महानगराध्यक्ष शरदआबा तायडे त्यासोबत माजी महानगरप्रमुख तर सध्याचे जिल्हा संघटक गजानन मालपुरे हे देखील जिल्हा प्रमुख पदाच्या शर्यतीत आहे. यात उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुख पदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकतील हे येणाऱ्या काही दिवसात समोर येईल.