जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२५
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित इंग्लिश मीडियम स्कूल ,पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक विभाग तसेच प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा येथे संस्कृती संवर्धन या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी खानदेश ची वैभव संपन्न संस्कृती आणि लोककलेचा समृद्ध वारसा असलेला कानबाई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
विवेकानंद प्रतिष्ठान द्वारा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील भारतीय ज्ञान प्रणाली अंतर्गत संस्कृती संवर्धन व लोककला संवर्धन हा उपक्रम वर्षभर घेण्याचे निश्चित केले आहे यात खानदेशातील समृद्ध वारसा असलेली संस्कृती उत्सव लोककला यांचा विद्यार्थ्यांना जवळून परिचय व्हावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे यातील कानबाई उत्सव हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यात कानबाई मातेची विधीवत स्थापना करून विद्यार्थ्यांना या उत्सवाचे महत्व इतिहास याच्याशी संबंधित लोककला कौटुंबिक पौराणिक ऐतिहासिक महत्त्व विशद करण्यात आले यानिमित्त खेळले जाणारे पारंपरिक खेळ उत्साहात खेळण्यात आले.
कानबाई ची पारंपारिक गाणी नृत्य या सर्वांवर विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींनी उत्साहात ठेका धरला हा आपला समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत जावा विद्यार्थ्यांना त्याचा परिचय व्हावा म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला या उत्सवा संदर्भात एक माहिती पुस्तिका देखील विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सर्व मुख्याध्यापक विभाग प्रमुख व शिक्षकांनी सहकार्य केले




















