अमळनेर : विक्की उत्तम जाधव
पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे टिळक स्मारक समिती जुना टाऊन हॉल येथे पूज्य साने गुरुजी स्मृती पुरस्कार वितरण समारंभ व स्मृती व्याख्यानमाला आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरण प्रसंगी ह भ प सद्गुरु प्रसाद महाराज गादीपती श्री संत सखाराम महाराज ,सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे उपाध्यक्ष डॉक्टर माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ , जयदीप पाटील, वित्त लेखा अधिकारी कपिल पवार यांच्या शुभहस्ते पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक विजय आधारसिंह पवार यांना सहपत्निक स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ ,पाच हजार रुपये रोख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्काराला उत्तर देतांना स्पर्धा परीक्षेचे संचालक विजय पवार म्हणाले की आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारापेक्षा सर्वात मोठा सन्मान आहे, मला मार्गदर्शन करणारे व सर्वांच्या सदिच्छा पाठीशी असल्यामुळे मी हा पुरस्कार त्यांना अर्पण करतो. त्या पुरस्काराने मला निश्चितच प्रेरणा मिळवून मी अधिक जोमाने काम करेल असे सांगितले.
विजय पवार यांच्या सन्मानपत्राचे वाचन भगिनी मंडळाच्या उपक्रमशील शिक्षिका ज्योती सोनवणे यांनी वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी केले. नोबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ जयदीप पाटील म्हणाले की चांगले काम नेहमीच उत्तम असते ते निष्काम असते डाव्या हाताने केलेले काम उजव्या हाताला कडू नये, तरुणांना रोजगार देणे व त्यांची टाळकी ठिकाणावर ठेवण्याचे काम अमळनेरचे शिक्षक करीत आहेत व महिलांची चळवळ सुद्धा अमळनेर मध्ये मोठी आहे. अमळनेर हे विचारांचे शहर आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्राला यामुळे दिशा देणारे शहर ठरेल यात शंका नाही असे त्यांनी सांगितले.
पूज्य साने गुरुजींच्या वाचनालयात पूज्य सानेगुरुजी यांच्या नावाने धडपडणाऱ्या विजय पवार सरांना पुरस्काराने सन्मान झाला.. निश्चितच वाचनालयाने योग्य निवड केली. शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक झपाटलेले व्यक्तिमत्त्व म्हणून पवार सर गेल्या बारा वर्षापासून मी निस्वार्थ प्रामाणिक सेवा करीत आहेत असे सांगितले.
व-हाडी जगातील बहुतेक प्रमुख भाषाप्रमाणेच, मराठी भाषा ही एकाहून अधिक पद्धतीने बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली तिची बोलीभाषा दर बारा कोसांगणिक उच्चारात, शब्दसंग्रहात, आघातांत व वाक्यप्रचारात बदलत राहते असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो. व-हाडी प्रामुख्याने विदर्भाच्या व-हाड भागात म्हणजेच अमरावती ,अकोला, बुलढाणा, यवतमाळ ,वाशिम या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बोलली जाते .तीसापेक्षाही जास्त वर्षापासून डॉ प्रा विठ्ठल वाघ या कविता लिहितांना दिसतात असे सांगत वऱ्हाडी हास्य कवी संमेलन सादरकर्ते नितीन वरणकर शेगाव ,प्राध्यापक संजय कावरे अकोला, गजानन मते परतवाडा, गौतम गुडधे परतवाडा यांनी अनेक वऱ्हाडी भाषेतील फॅशन, दारू नंदी आई,,पत्नी,शेतकरी अशा विविध वऱ्हाडी भाषेमध्ये कविता सादर करून काही गमतीशीर किस्से सांगत प्रेक्षक लोटपोट झाले. रात्री दहा वाजेपर्यंत श्रोत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली. सर्व वऱ्हाडी हास्य कवी यांचा सत्कार वाचनालयाचे पदाधिकाऱ्यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त सौ वसुंधरा दशरथ लांडगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे,सचिव प्रकाश वाघ, उपाध्यक्ष प्रा. डॉ माधुरी भांडारकर सहसचिव सुमित कुलकर्णी, विश्वस्त चंद्रकांत नगावकर, कार्यकारणी सदस्य एडवोकेट रामकृष्ण उपासनी, पी एन भादलीकर, भीमराव जाधव, निलेश पाटील, ईश्वर महाजन, दीपक वाल्हे व वाचनालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले. यावेळी कार्यक्रमाला अनेक मान्यवर ,पत्रकार, साहित्यिक, कवी,सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. महिला पण मोठ्या संख्येने उपस्थित होत्या