जळगाव मिरर / ९ एप्रिल २०२३
दि.८ रोजी वसंतवाडी तांडा ता.जि. जळगांव या ठिकाणी गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या माध्यमातून जागतीक बंजारा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला ज्यात व्यसनाधीनता, उच्च शिक्षण, उद्योग,रोजगार या विषयी जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात समाजाचे आराध्यदैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला सूतिहार व पूजन करून वंदन करण्यात आले. त्यानंतर प्रोजेक्टर लाउन छोट्या पडद्यावर शाब्बास गण्या हा लघुपट दाखविण्यात आला. त्यातून दारू मुळे कुटुंबातील सदस्यांना होनारा त्रास व शिक्षण सुधारणा याबाबत शुभम पवार या पी जी विद्यार्थीने विष्लेषण केले. लघुपट मधील सारांश व्यक्त केला.
शुभम पवार हे 3 महिन्यापासून व्यसनमुक्ती वर काम करीत आहेत यांनी ग्रामीण भागातील युवकांना संबोधित करीत दारू, गुटखा, खर्रा याच्या सेवना मुळे होणारे दुष्परिणाम यावर आधारित चित्रफित दाखवून जाणीव करून देण्यात आले. दारूमुळे कुटूंब उद्धवस्थ झाल्याचे उदाहरणे देखील देण्यात आले. त्याचबरोबर शिक्षणांपासून वंचित घटकांना सोबत घेऊन त्यांना देखील शिक्षणांच्या प्रवाहात सहभागी करून सुशिक्षित समाज निर्माण करावा असे ग्रामस्थांना समजवून सांगण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर गिरासे यांनी केले. तर प्रास्ताविक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले. प्रसंगी गजमल चव्हाण, फुलसिंग पवार,ज्ञानेश्वर चव्हाण,अरुण चव्हाण,बाल गोपाळ ,युवक मित्र, ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेत.