
जळगाव मिरर | २१ मार्च २०२५
सध्या सर्वत्र बहुतांशी व्यवहार हे चलनाद्वारे न होता, युपीआयद्वारे (UPI) होत आहेत. यासाठी Google Pay, Phone Pay आणि अन्य अप वारले जातात. दरम्यान, युपीआय युजर्ससाठी ही मोठी बातमी आहे. कारण युपीआयला जोडलेले फोन नंबर जर वापरात नसतील ते निष्क्रिय असतील. तर १ एप्रिलपासून ते बंद करण्यात येणार आहेत, असे वृत्त आहे.
१ एप्रिल २०२५ पासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) निष्क्रिय मोबाइल नंबरशी लिंक केलेले यूपीआय आयडी डिलिंक करण्यास सुरुवात करेल. यामुळे प्रभावित युजर्सच्या डिजिटल पेमेंटमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. ही समस्या टाळण्यासाठी, तुमच्या बँक रेकॉर्ड तुमच्या सध्याच्या मोबाइल नंबरसह अपडेट केल्या आहेत याची खात्री करावी, असेदेखील कंपनीने म्हटले आहे.
एनपीसीआयने (NPCI) म्हटले आहे की, १ एप्रिल २०२५ पासून, ते निष्क्रिय मोबाइल नंबरशी लिंक केलेले यूपीआय आयडी डिलिंक करण्यास सुरुवात करेल. जर नोंदणीकृत मोबाइल नंबर निष्क्रिय असतील तर व्यवहारांसाठी गुगल पे, फोनपे, पेटीएम आणि इतर यूपीआय ॲप्स वापरणाऱ्या युजर्सवर याचा परिणाम होऊ शकतो.
जर तुमचा फोन नंबर बराच काळ निष्क्रिय असेल, तर बँका त्यांच्या रेकॉर्डमधून तो काढतील आणि खात्यासाठी यूपीआय सेवा निलंबित केल्या जातील. बँकिंग सिस्टममधील तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी आणि फसवणुकीचा धोका कमी करण्यासाठी बँका हे करत आहेत, विशेषतः जेव्हा पुन्हा नियुक्त केलेले नंबर जुन्या बँक खात्यांशी जोडलेले राहतात. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीकडून पावले उचलण्यात येत आहेत.
कोणत्या UPI युजर्सवर परिणाम होऊ शकतो?
• ज्या ग्राहकांनी त्यांचे मोबाईल नंबर अपडेट केले आहेत पण ते बँक खात्याशी जोडलेले नाहीत.
• जे ग्राहक निष्क्रिय मोबाईल नंबरवर UPI सेवा वापरत आहेत.
• ज्यांनी त्यांचे मोबाईल सिम कार्ड बँक माहिती अपडेट न करता जोडले आहे.
UPI सेवांमधील अडथळे टाळण्यासाठी ‘हे’ करा
• बँकेत तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर कार्यरत आहे की नाही, याची खात्री करा.
• १ एप्रिलपर्यंत तुमच्या नवीन मोबाईल नंबरसह तुमचे बँक रेकॉर्ड अपडेट करा.
• मागील नंबर अंतर्गत निष्क्रिय किंवा न वापरलेले खाते शोधा आणि ते सक्रिय करा.
कंपनीकडून हा नियम का लागू केला जातोय?
बँकिंग क्षेत्र आणि UPI सिस्टीममध्ये निष्क्रिय नंबरमुळे निर्माण होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या वाढत्या धोक्याला आणि तांत्रिक समस्यांना प्रतिसाद म्हणून NPCI ने हा बदल केला आहे. जेव्हा टेलिकॉम कंपन्या नवीन ग्राहकांना जुने नंबर पुन्हा वाटप करतात, तेव्हा ते सुरक्षिततेला धोका निर्माण करते, ज्यामुळे बँकिंग सुविधांमध्ये अनधिकृत प्रवेश होऊ शकतो. याला प्रतिसाद म्हणून, एनपीसीआयने बँका आणि यूपीआय प्लॅटफॉर्मना त्यांचे रेकॉर्ड साप्ताहिक आधारावर अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून निष्क्रिय मोबाईलची संख्या संतुलित राहतील.