जळगाव मिरर | २६ मे २०२३
राज्यातील उन्हाचा पारा काही प्रमाणात कमी झाला असतांना जळगाव शहरातील नागरिकांना पुन्हा एकदा एक दिवस उशिरा पाणी मिळणार आहे. वाघूर योजनेच्या १५०० मिमी व्यासाच्या मुख्य पाइपलाइनला गळती लागली असून, महापालिकेतर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाला २४ तासांचा कालावधी लागणार असल्याने शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यामुळे शुक्रवार २६ रोजी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
२७ मे रोजी या भागात पाणीपुरवठा पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर, पिंप्राळा टाकी, मानराज टाकी, दुसरा दिवस शिंदेनगर, अष्टभुजा, वाटिका आश्रम परिसरातील राहिलेला भाग, खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी राहिलेला भाग. नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसरातील उर्वरित भाग. डी.एस.पी. बायपास तांबापुरा, शामाफायर समोरील परिसर. डी.एस.पी. टाकीवरून जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रवन कॉलनी, आनंदनगर, तिवारीनगर, बाहेती शाळा इ. भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी व इतर परिसर, मेहरुण भागातील राहिलेला परिसर, मेहरुण गावठाण, दत्तनगर, लक्ष्मीनगर, इकबाल कॉलनी, एकनाथनगर, मंगलपुरी परिसर, सद्गुरूनगर, हनुमाननगर, लीला पार्क, गौरव हॉटेल परिसर आहे.