• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

अन्यथा आम्ही थेट मंत्रालयात शिरू ; अखेर बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 14, 2025
in राजकीय, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
अन्यथा आम्ही थेट मंत्रालयात शिरू ; अखेर बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जून २०२५

गेल्या ७ दिवसापासून राज्यातील शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू गत 7 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत होते. या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला होता. या प्रकरणी त्यांनी सरकारला परवापासून अन्नत्याग करण्याचाही इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी तातडीने त्यांची भेट घेऊन त्यांना सरकार आपल्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे सांगत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी उदय सामंत यांच्या विनंतीचा मान राखत आपले अन्नत्याग उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. उद्याचे चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बच्चू कडू उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, सरकारने आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेत नाही, तर स्थगित करत आहोत. सरकारने आपल्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर 2 ऑक्टोबर रोजी आपण थेट मंत्रालयात शिरू. आपण सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा चकवा देऊ. सांगू नागपूरला व जाऊ मुंबईला. यांना आपण एकदा छत्रपतींचा गनिमी कावा दाखवू.

मुख्यमंत्री सध्या आम्हाला तारीख सांगण्यास तयार नाहीत. पण आम्ही त्यांना 2 ऑक्टोबरची तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल. अन्यथा आम्ही त्यांना माफ करणार नाही. आत्ता आपण हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करत आहोत. मी कार्यकर्त्यांचा अंत पाहू शकत नाही. ते माझ्याशिवाय उठण्यास तयार नाहीत. एक आज्जी तर ऐकण्यास तयारच नव्हती. सर्वच जातीधर्माच्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांचे मी आभार मानतो. हे यश आमचे नव्हे तर इथे येणाऱ्या सर्वांचे यश आहे.

तत्पूर्वी, बच्चू कडू यांनी सरकारला सोमवारपासून पाणी सोडण्याचा इशारा दिला होता. खरे तर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय यापूर्वीच व्हायला हवा होता. पण सरकारने आता यासंबंधी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे. पण या समितीचाी अहवाल केव्हा येणार? कोणत्या तारखेला कर्जमाफीची घोषणा करणार? हे काहीही स्पष्ट नाही. या मुद्यावर मी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. या बैठकीत एखादा निर्णय होईपर्यंत कार्यकर्त्यांनी संयम राखावा. कोणतेही अनुचित कृत्य करू नये. पण माझी मानसिकता आहे की, 16 तारखेपासून पाणीही सोडून द्यावे, असे बच्चू कडू म्हणालेत.

दुसरीकडे बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपोषणामुळे काय स्थिती होते हे पाहण्यासाठी एक दिवसाचा उपवास करण्याचे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवस उपवास करावा. त्यानंतर आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पाहावे. यापुढे बच्चू कडू यांना अन्नत्याग करण्यास फशी पाडले, तर खबरदार. प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग आंदोलन करण्यास भाग पाडेल हा माझा शब्द आहे, असे त्या म्हणाल्या.

बच्चू कडू पाचव्यांदा अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांना सुळावर देण्यासाठी त्यांच्या आईने त्यांना जन्माला घातले आहे का? कोणत्याही शासनाने गेंड्याची कातडी बाजूला ठेवून मातीतल्या माणसांचे कल्याण करावे. भाजप असेल किंवा काँग्रेसचे सरकार असेल सर्वांनी शेतकरी व दिव्यांग यांच्यासाठी जातपात व स्वतःचा स्वार्थ दूर ठेवावा, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या होत्या.

Related Posts

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन
जळगाव

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026
खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

January 19, 2026
नशिराबादला लाठ्या काठ्यांसह लोखंडी पाईप अन् कुऱ्हाडीने वार, १६ जण जखमी
क्राईम

नशिराबादला लाठ्या काठ्यांसह लोखंडी पाईप अन् कुऱ्हाडीने वार, १६ जण जखमी

January 19, 2026
योगामुळे मानसिक, शारिरीक संतुलन – अतुल जैन
जळगाव

योगामुळे मानसिक, शारिरीक संतुलन – अतुल जैन

January 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

अभाविप देवगिरी प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. सुरेश मुंढे व प्रदेश मंत्री म्हणून जळगावचे डॉ. वरुणराज नन्नवरे यांचे निर्वाचन

January 19, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

January 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

महामार्गावरील भीषण अपघातात ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू !

January 19, 2026
खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

खळबळजनक : खाजगी शाळेच्या शिक्षकाचा रेल्वे अपघातात मृत्यू !

January 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group