जळगाव मिरर / २४ फेब्रुवारी २०२३ ।
देशात लग्नसराई सुरु असतांना वेगवेगळ्या भागातील व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात व सोशल मिडियामुळे कोण कुठे काय करतो हे तत्काळ लक्षात येत असते. अशीच एक संतापजनक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. जौनपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे एक व्यक्ती शहागंज परिसरात चौथ्यांदा लग्न करत होता असे सांगितले जात आहे.
पण त्याच्या लग्नाची माहिती मिळताच या व्यक्तीच्या तिन्ही पत्नींनी शहागंज गाठून त्याला बेदम मारहाण केली. या प्रकरणावरून परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. मात्र, नंतर पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरण शांत केले. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, वाराणसी जिल्ह्यातील आदमपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पठाणी टोला येथील एका तरुणाने तीनवेळा लग्न केले आहे. त्याने पहिले लग्न कानपूर जिल्ह्यातील जाजमाऊ येथील मुलीशी केले. त्यानंतर दुसरा विवाह आझमगढ येथील तरूणीशी केला तर तिसरा विवाह शहागंजच्या इराकियाना येथील तरुणीसोबत केला. मात्र, लग्नानंतर मुले झाल्यावर त्याने त्यांना सोडून दिल्याचा आरोप संबंधित पत्नींनी केला आहे. एकामागून एक तो तिन्ही बायकांशी सारखाच वागला असल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
#Jaunpur#जौनपुर 3-3 निकाह करना पड़ गया भारी
पहली पत्नी ने शख्स को तहसील में धूना
बच्चे से नहीं मिलने देने पर भड़की पत्नी
शाहगंज कोतवाली इलाके का मामला@jaunpurpolice pic.twitter.com/Wxxq0DsjkA— Vishal Sonkar (@vishalsonkarjnp) February 24, 2023
आपल्या तिन्ही पत्नींना सोडल्यानंतर आरोपीने चौथीसोबत विवाह केला. पतीच्या या वागणुकीमुळे संतप्त झालेल्या पत्नींनी न्यायालयात अर्ज करून न्याय मागितला आहे. शाहगंज येथील रहिवासी असलेल्या त्याच्या पत्नीला 13 वर्षांचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. पत्नींनी दिलेल्या अर्जाच्या आधारे हे प्रकरण न्यायालयात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पतीने तारखेला न्यायालयात धाव घेतली. त्याचवेळी कोर्टात तारखेला पती आल्याची माहिती मिळताच त्याच्या तीन बायकाही तिथे पोहोचल्या. यादरम्यान पतीला पाहून तिन्ही पत्नी संतप्त झाल्या आणि त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.