• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राणा यांचा बोलविता धनी कोण? ठाकरेंचा भाजपवर निशाणा?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 3, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राणा यांचा बोलविता धनी कोण? ठाकरेंचा भाजपवर निशाणा?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३ नोव्हेबर २०२२

राज्यातील शिंदे गटाचे आ.बच्चू कडू व भाजपचे आ.रवी राणा यांचा वाद मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून जरी मिटला असला तरी नुकतीच रवी राणा यांनी घरात घुसण्याची भाषा केल्याने हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे. यावर आता ठाकरे गटाने  प्रतिक्रिया दिली आहे.  रवी राणा हे पक्के हनुमान भक्त आहेत. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल, असे थेट आवाहनही ठाकरे गटाने बच्चू कडूंना केले आहे. तर रवी राणा हे देवेंद्र फडणवीसांना मानणारे आमदार आहेत. त्यामुळे फडणवीसांची मान्यता घेऊनच राणांनी ५० खोक्यांचे सत्य जाहीर केले, असा थेट निशाणा आज ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीसांवर साधला.

ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये म्हटले आहे की, आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची (फडणवीसांची) मान्यता असल्याशिवाय? उद्या खोकेवाल्यांच्या घरात नाते जुळवायचे म्हटले तरी लोक मागे हटतील. काळाने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. सत्य हे ‘कडू’च असते.

शिवसेनेने म्हटले आहे की, प्रहार पक्षाच्या अमरावतीमधील मेळाव्यात बोलताना कडू यांनी राणा यांच्या आरोपाचे कडू घोट महप्रयासाने पचवले. कडू म्हणाले, ‘सत्ता गेली चुलीत! पहिली वेळ आहे म्हणून माफ करू, पण यापुढे अशी चूक केली तर ‘प्रहार’चा वार दाखवून देऊ.’ कडू यांचा हा इशारा जसा राणा यांना आहे तसाच तो सरकारलाही आहे. याचे धोके ठावूक असल्यानेच महाराष्ट्रात असंख्य प्रश्नांचा डोंगर असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना या दोन आमदारांचा ‘राडा’ संपविण्यात काही दिवस खर्चावे लागले.

शिवसेनेने म्हटले आहे की, अमरावतीमधील दोन आमदार बच्चू कडू व रवी राणा यांच्यात एखादा तात्त्विक वाद राज्याच्या पिंवा लोकांच्या विकासासाठी घडला असता तर समजण्यासारखे होते. विदर्भातील मोठे उद्योग गुजरातमध्ये पळवून नेले व वैदर्भी जनतेचा लाखोंचा रोजगार बुडाला म्हणून या दोघांत भांडण पेटले असते तरीही ते समजून घेता आले असते. विकासासाठी निधी कमी पडत आहे, ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत यावर दोन आमदारांनी शब्दांची ढाल-तलवार चालवली असती तरी जनतेने त्यांचे स्वागत केले असते व त्यांच्या तोंडून निघालेली चिखलफेक सहन केली असती, पण दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरून सुरू झाले व महाराष्ट्राने तमाशा पाहिला. बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते व गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतले असा हल्ला आमदार राणा यांनी कडू यांच्या मतदारसंघात जाऊन केला. बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार असल्याचा दुसरा हल्ला राणा यांनी करताच कडू यांनीही हिसका दाखवला व राणांची बरीच पोलखोल केली.

राणा-कडू वाद मिटलेला नाही
शिवसेनेने बच्चू कडू यांना टोला लगावत म्हटले आहे की, बच्चू कडू यांची वेदना समजून घेतली पाहिजे. कडू म्हणतात, कालपर्यंत आपली ओळख शेतकरी-कष्टकऱयांचा पैवारी, दिव्यांगांना मदत करणारा आमदार अशी होती, पण आता एखाद्या लग्नात गेलो तरी ‘आला आला, खोकेवाला आला’ असे हिणवले जाते.(उप)मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीनंतर राणा यांनी खोक्यांसंदर्भातले त्यांचे शब्द मागे घेतले आहेत. पण, राणा यांनी हे शब्द मनापासून मागे घेतले काय ही शंकाच आहे. कारण रवी राणा यांनी बुधवारी पुन्हा ‘आम्हाला कोणी धमक्या देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमत आहे’, अशी थेट धमकीच कडू यांना दिली. त्यावर कडू यांनीही ‘मी 5 तारखेला घरी आहे. त्यांनी मारायला यावं’ असा प्रतिइशारा दिला आहे. म्हणजे राणा-कडू यांच्यातील वाद मिटलेला नाही.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group