• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात लकी ड्रॉच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक; भिशी चालक महिला फरार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 31, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ जुलै २०२६ 

हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे २० महिने लकी ड्रॉ (भीशी) मध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याचे अमिष दाखवित गिता निलेश दारा (रा. सरस्वती अपार्टमेंट, आदर्शनगर) या महिलेने २० जणांची २० लाख ८ हजार रुपयात फसवणूक केली. ही घटना सप्टेंबर २०२४ ते मे २०२६ दरम्यान घडली. ही महिला अशाच पद्धतीने तीन वेगवेगळ्या पद्धतीने भिशी चालवित असल्याने तीने अनेक जणांना गंडविल्याचा संशय असून गुन्हा दाखल करण्यापुर्वीच ती महिला पसार झाली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील टीएम नगरात राहणाऱ्या आयुषी दीपक बुटवाणी (रा.टीएमनगर) यांचे सिंधी कॉलनीत रेडीमेड कपड्यांचे दुकान आहे. आदर्शनगरात राहणारी संशयित गिता दारा ही महिला त्यांच्याकडे खरेदीसाठी येत होती. यावेळी त्या महिलेने बुटवाणी यांच्यासोबत ओळख करुन त्यांना भिशीतून चांगला परतावा मिळविण्याचे अमिष दाखवीत लकी ड्रॉ भिशीमध्ये गुंतवणुक करण्यास सांगितले. गीता दारा ही महिला २०२४ पासून भिशी (चिट फंड) चालवत होती. बुटवाणीसह अनेक जणांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्या सर्वांनी त्या महिलेवर विश्वास ठेवून सप्टेंबर २०२४ पासून दरमहा नियमितपणे पैसे भरणे सुरू केले.

भिशी भरणाऱ्यांऐवजी नातेवाईकांचाच लागला नंबर २०२४ मध्ये सुरु झालेली लकी ड्रॉ ची ही भिशी मे २०२६ मध्ये पूर्ण होणार होती. मात्र, संपूर्ण मुदत संपत आली तरी भिशी भरणाऱ्या कोणत्याही सामान्य सदस्याचा नंबर लागलेला नव्हता. केवळ भिशी चालविणाऱ्या गीता हिचे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींचेच नंबर लकी ड्रॉ मध्ये निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.

भिशीमध्ये गुंतवणुक करणाऱ्या सदस्यांनी ज्यावेळेस आपल्या हक्काचे पैसे व परतावा मागितला. तेव्हा गीता हिने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. गीताला फोन केला असता, तिचा नंबरही बंद येत होता. त्याचप्रमाणे काही वेळा संपर्क झाल्यानंतर दि. २६ जून, त्यानंतर दि. ३१ जुलै रोजी पैसे दिले जातील असे गीताकडून सांगण्यात आले होते.

भिशी चालविणाऱ्या संशयित गिता दारा यांच्याकडे गुंतवणुक करणाऱ्यांनी वारंवार पैशांसाठी तगादा लावला. त्यावेळी त्यांना पाठपुरावा करुनही भिशीतील रक्कम मिळत नव्हती. दरम्यान, भिशी काढणाऱ्या काही सदस्य २३ जुलै २०२६ रोजी सकाळी गीताच्या घरी गेले. मात्र, त्या ठिकाणी गीताच्या घराला कुलूप असल्याचे दिसून आले. तिचे दोन्ही मोबाईल फोनही बंद येत होता.

गुंतवणुक करणाऱ्यांनी गिता दारा हीच्या काही नातेवाईकांशी संपर्क साधला असता, त्यांनाही ती कोठे गेली, हे माहिती नव्हते, गीता फरार झाल्याचे समजताच नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली, या प्रकरणी दि. २९ जुलै रोजी आयुषी दीपक बुटवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गीता दारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीता हिने अशाच प्रकारे आणखीही काही भिश्या चालवल्या असून, तिने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गीताने चालविलेल्या भिशीतून २० जणांची फसवणूक झाली असून, यामध्ये ओम रविंद्र माळी (४० हजार), पुर्णिमा अनिल हसवानी (६८ हजार), मनोज दिगंबर चौधरी (२६ हजार), लक्ष्मी कारडा (४० हजार), पिंकी विजय हेमनानी (१ लाख ८ हजार), काजल संजय ललवाणी (५ लाख), चंद्रकांत रामदास जोशी (४० हजार), दिव्या भिमराव पवार (६० हजार), सुलक्षणा व शामकांत पवार (९८ हजार), निशा दिनेश ओचांनी (६० हजार), दिलीप कुमार तेओमलन (१ लाख), निलेश तुकाराम सोनवणे (२० हजार), सागर सुमिल महाजन (१ लाख २८ हजार), सिमा सुनिल अडवाणी (२ लाख), सोनी दिपक घुगे (३० हजार), सविता विनोद हटकर (३० हजार), मीना राजु घुगे (३० हजार), मुस्कान वालेचा (१ लाख ७४ हजार), जय नरेश राजपाल (४० हजार), गजानन शंकर पाटील (२ लाख १३ हजार) यांचा समावेश आहे.

Related Posts

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026
गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !
जळगाव

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group