जळगाव मिरर | १४ नोव्हेबर २०२३
जळगाव शहरातील अनेक रस्त्यावर अपघाताच्या घटनेत नियमित वाढ होत आहे. अशीच एक घटना शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोरून जात असतांना अज्ञात मोटारसायकलने महिलेच्या स्कुटीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मोटारसायकल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाघ नगर परिसरातील रहिवासी वंदना सुनिल ठाकूर (वय-४२) या महिला रविवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वंदना ठाकूर या महिला बी.जे. मार्केट मधून खरेदी करून घरी जाण्यासाठी स्कूटीने निघाले. त्यावेळी बीएसएनएल कार्यालयासमोर स्कूटीने जात असतांना दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएच ९००८) ने जोरदार धडक दिली. या अपघातात वंदना ठाकूर या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने खागसी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अज्ञात दुचाकी धारकावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.