जळगाव मिरर | २० जानेवारी २०२४
अयोध्यानगरीत श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होत आहे. यापार्श्वभूमींवर जळगाव शहरात देखील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तर अनेक भागात सामाजिक कार्यकर्त्याकडून सामाजिक उपक्रम देखील राबविले जात आहे. या आज दि.२० रोजी जळगावात ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखाताई पाटील यांच्यामार्फत महिला पदयात्रा देखील काढण्यात आली होती.
यावेळी शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील चिमुकले राम मंदिर याठिकाणी प्रभू श्री रामांची आरती करून पदयात्रेला सुरुवात झाली. तर हि पद यात्रा गोलाणी मार्केट परिसरातील हनुमान मंदिर येथे समारोप करण्यात आला. या पदयात्रेत श्रीरामांचा जयघोष करीत परिसर दणाणून टाकला होता. यावेळी आरतीला आ.राजूमामा भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, रेखा कुलकर्णी, नंदिनी दर्जी, सुवर्णा पाटील, चित्रा मालपाणी, संगीता पाटील यांच्यासह अनेक महिला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्यातर्फे दुधासह पाणी वाटप
गेल्या अनेक वर्षापासून नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी शहरातील चिमुकले राम मंदिर ते हनुमान मंदिर पर्यत निघालेल्या या पदयात्रेत भाविकांना दुधासह पाणीचे वाटप करीत पदयात्रेत सहभागी होत श्री रामांचा जयघोष केला.