जळगाव मिरर | २९ नोव्हेबर २०२४
सोन्याचे तयार केलेले ९७ हजार ५०० रुपयांचे ७८ मण्यांची अर्जंट डिलेव्हरी असल्याने अंकुश पुंडलिक सोनवणे यांनी ते मणी चालक योगेश भगवान गोयल (वय ३२, रा. पॉवर हाऊस) याच्याकडे दिले होते. मात्र चालकाने मणीची डिलेव्हरी न करता ते परस्पर विक्री करुन अपहार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध बुधवार दि. २७ रोजी शनिपेठ पोलिसात अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विठ्ठलपेठेतील श्रीकृष्ण नगरात अंकुश पुंडलिक सोनवणे (वय ३२) हे वास्तव्यास असून त्यांचे महाकाल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांच्याकडे धीरज राजेंद्र रंधीर, राजेंद्र रंधीर, भावेश सोनार हे मजूर कामाला आहेत. अंकुश सोनवणे हे व्यापाऱ्यांकडून सोने घेवून त्याचे मणी, मंगळसूत्र बनवून देण्याचा व्यावसाय आहे. सोनवणे यांच्याकडे गेल्या तीन वर्षांपासून योगेश भगवान गोयल हा चालक म्हणून कामाला आहे. दि. १२ सप्टेंबर रोजी शहरातील अहिरराव मणीवाले यांच्याकडून १३ ग्रॅम सोने घेवून त्यांना मणी तयार करुन द्यायचे होते. दि. १४ रोजी धीरज रंधीर याने मणी बनवून अंकुश सोनवणे यांच्याकडे दिले होते. ऑर्डर असलेले त्या मणीची अर्जंट डिलेव्हरी करायची असल्याने सोनवणे यांनी ते मणी चालक योगेश गोयल याच्याकडे देवून ते अहिराव मणीवाले यांच्याकडे देण्यास सांगितले.