जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२४
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते जुळवीत असतांना महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे अजित पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.
खा.संजय राऊत म्हणाले कि, अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. अजित पवार बारामती मध्ये विधानसभा निवडणूक हरणार आहेत, नक्की आहे. हे त्यांना देखील माहिती आहे. त्यामुळे आता त्यांच्याविषयी मी काय बोलणार? असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. जे तुमच्या पक्षाचे नेते होते आणि तुमच्यासाठी वडिलांप्रमाणे असणारे शरद पवार यांनी तुम्हाला सर्व काही दिले. त्यांनी तुम्हाला सर्व काही दिलेले असतानाही तुम्ही मात्र, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे आता पश्चाताप करून काही उपयोग होणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
बाँम्बेचे नामकरण मुंबई करण्यासाठी मी देखील लढा दिला असल्याचे भाजप नेते अमित शहा यांनी म्हटले होते. यावरुन देखील संजय राऊत यांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. मुंबईने नामांतर करण्यासाठी आम्ही आणि स्व. बाळासाहेब ठाकरेंनी अनेक आंदोलने उभी केले असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. त्यासाठी मराठी माणसांनी बलिदान दिले असल्याचे देखील मे म्हणाले. शिवसेनेने विविध आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी लावून धरली होती. बॉम्बेचे नाव मुंबई करण्यात अमित शहा यांचा हात असल्याचे ऐकल्यानंतर आता आम्ही त्यांना हसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाँम्बेचे नामकरण मुंबई करण्यासाठी 105 मराठी बांधवांनी बलिदान दिले आहे, विसरता येणार नाही. यापुढे देखील बलिदान देण्याची मराठी माणसाची तयारी असल्याचे राऊत त्यांनी म्हटले आहे.