जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२३
देशातील अनेक तरुणांना नोकरी नसल्याने ते बेरोजगार असून आता दहावी पास तरुणांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट रेल्वे विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. रेल्वे विभागात ही बंपर भरती सुरू होणार आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवाराला आयटीआय पास असणे देखील गरजेचे आहे. रेल्वे विभागाने विविध पदांसाठी ही भरती काढलीये. rrcnr.org या रेल्वेच्या साईटवर या भरती प्रक्रियेसंदर्भातील माहिती तुम्हाला मिळू शकते.
विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने पार पडत आहे. 11 डिसेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. 1 जानेवारी 2024 पर्यंत उमेदवार या भरती प्रकियेसाठी अर्ज हे करू शकतात. रेल्वेकडून जाहिर करण्यात आलेले नोटिफिकेशन उमेदवारांनी सर्वात अगोदर व्यवस्थितपणे वाचून घ्यावे आणि त्यानंतर आपण कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत, हे चेक करावे.
विशेष म्हणजे रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया तब्बल 3093 जागांसाठी होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी रेल्वेकडून वयाची अट ही लागू करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. जर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करत असाल तर तुमचे वय हे 15 ते 24 पर्यंत असावे. याशिवाय या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज नाही करू शकत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्डाचे दहावी पासचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमधून आयटीआय होणे देखील आवश्यक आहे. rrcnr.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे अर्ज करण्याची अगदी सोपी अशी पद्धत आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला 100 रूपये फिस लागणार आहे. 12 फेब्रुवारी 2024 ला मार्कनुसार रेल्वेकडून निवड झालेल्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहिर केली जाईल. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत ही द्यावी लागणार नाही. चला तर मग रेल्वे विभागात काम हवे असेल तर लवकर करा अर्ज आणि मिळवा नोकरी.