जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२३
देशभरातील अनेक तरुण नोकरीसाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात. विविध राष्ट्रीय संस्था, खासगी कंपन्यांतील भरतीची वाट ते पाहत असतात. तुम्हीही नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नॅशनल हायवे ॲथॉरिटी ॲाफ इंडिया – एनएचएआय) या संस्थेत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार या पदांच्या भरतीसाठी रिक्त जागांची यादी एनएचएआयकडून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया देखील या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच nhai.gov.in वर सुरू झाली असून, ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 4 जानेवारी 2024 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार nhai.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.
सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार या पदांवरील एकूण 18 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या पदांवर निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नोकरी दिली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वाचावेत.
एनएचएआयकडून 18 सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी 8 डिसेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
वयोमर्यादा किती आहे?
एनएचएआय परीक्षा प्राधिकरणाने पात्रता निकष आणि वयोमर्यादा जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत अधिसूचनेत या तपशीलांबाबत माहिती पाहू शकतात.
आवश्यक पात्रता –
सल्लागार- मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून विज्ञान विषयातील वन, कृषी, फलोत्पादन/सामाजिक वनीकरण या विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामाचा 20 वर्षांचा अनुभव असावा.
कनिष्ठ सल्लागार – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून वन, कृषी, फलोत्पादन/सामाजिक वनीकरण या विषयात पदवी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित विभागात काम करण्याचा 15 वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा काय असेल?
ऑनलाइन अर्ज मिळाल्याच्या तारखेला उमेदवाराचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असावे. या संबंधीचे अधिक तपशील अधिकृत अधिसूचनेमध्ये पाहता येतील.
वेतन किती?
निवड झालेल्या उमेदवाराला खाली दिलेल्या अटींवर आधारित पगार मिळेल. सार्वजनिक निधीतून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सेवानिवृत्त अधिकार्यांना 90,000 रुपये (सर्व समावेशक) आणि वाहतूक भत्ता मिळेल. सार्वजनिक निधीतून निवृत्ती वेतन न घेणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्यांना 1,25,000 रुपये (सर्व समावेशक) आणि वाहतूक भत्ता मिळेल. तुम्ही या नोकरीसाठी पात्र असाल तर तातडीने अर्ज करू शकता.