जळगाव मिरर | ८ ऑक्टोबर २०२४
राष्ट्रीय महामार्गावर बोहर्डी गावाजवळ टँकरच्या धडकेने पायी जाणारा ४० वर्षीय तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ४ ऑक्टोबर रोजी घडली होती. जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्याचा दि ६ रोजी मृत्यू झाला आहे. वरणगाव पोलिसात टँकरचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टॅन्कर क्रमाक जी जे १६ ऐ यू २४७५ मुक्ताईनगर कडुन वरणगांव कडे येतांना भरधाव वेगाने चालवुन पायी चालणाऱ्या राजेश ऊर्फ (बंटी) चिमण पटेल, वय ४० राहणार पवन नगर यास समोरुन जोरदार धडक मारुन त्यांचे गंभीर दुखापतीस कारणीभुत झालेला असुन सदर टँकर वाहन घेवुन निघुन गेलेला आहे. जखमी राजेश यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होते त्या दरम्यान त्यांच्या मृत्यु झाला आहे. या प्रकरणी आसीफ पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहे कॉ प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.
