जळगाव : प्रतिनिधी
शहरातील तांबापुरा परिसरात असलेल्या गवळीवाड्यात दोन जणांच्या किरकोळ भांडणावरून दोन गटात हाणामारी होवून तुफान दगडफेक करण्यात आल्याची घटना मंगळवारी १७ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात जमावावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गवळीवाडा येथील बिस्मिल्ला चौकात मंगळवार १७ मे रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दोन जणांनामध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून दोघांनी एकमेकांच्या एरियातील तरूणांना बोलावून घेतले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने हाणामारी होवून तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये स्थानिक रहिवाश्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. तर या दगडफेकीत शिरीनबी शेख युनूस (वय-२२) रा. तांबापुरा, कपाटवाली गल्ली जळगाव ह्या जखमी झाले आहे. जखमी महिलेला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मुदस्सर काझी, इम्रान सैय्यद, पोहेकॉ राजेंद्र ठाकूर, इमरान बेग, रमेश अहिरे, जामीर मुश्ता शेख यांनी धाव घेवून जमावाला पांगवापांगव केली.
या घटनेप्रकरणी शिरीनबी शेख युनूस (वय-२२) रा. तांबापुरा, कपाटवाली गल्ली जळगाव आणि पोलीस नाईक जमीर मुश्ताक शेख यांनी दिलेल्या वेगवेगळ्या फिर्यादीवरून समीर काकर, सैय्यद सलमान, कल्पेश सोनार, दिपक, अजय, राहुल, गुलाब, वास्तव, सोमा, नितीन, लखन, गोविंदा गायकवाड, भिला हटकर, विठ्ठल हटकर, इमरान तडवी, शाहरूख खाटीक, सलमान मोहम्मद कासीम, रिजवान उर्फ काल्या गयासोद्दिन शेख (सर्वांचे पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह इतर ३० ते ४० जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.