जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५
देशातील उत्तर प्रदेशातील कन्नौज रेल्वे स्थानकावर शनिवारी दि.११ बांधकाम सुरू असलेल्या छताचा स्लॅब कोसळला. यामध्ये २५ हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर ६ जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले असून, तिघा कामगारांची प्रकृती चिंताजनक असून, बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या राज्य आपत्ती दलाचे पथक, पोलिस आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. अडकलेल्या बांधकाम कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. वाचवलेल्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या घटनेत जखमी झालेल्यांना योग्य उपचार मिळावेत, असे देखील निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अमृत भारत योजनेअंतर्गत, कन्नौज शहरातील रेल्वे स्टेशन १३ कोटी रुपये खर्चून रेल्वेस्थानक विकसित केले जात आहे. यामुळे स्टेशनच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. स्टेशनच्या एका बाजूला तीन दिवसांपासून लिंटेल टाकण्याचे काम सुरू होते. शनिवारी दुपारी लोखंडी शटरिंगसह लिंटेल कोसळले. सध्या आठ जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. समाजकल्याण मंत्री असीम अरुण आणि डीएम शुभ्रांत कुमार शुक्ला घटनास्थळी पोहोचले आहेत. हायड्रा आणि बुलडोझर वापरून बचावकार्य सुरू आहे. सुमारे दोन तासांनंतर ढिगारा काढल्यानंतर मृतांची स्थिती स्पष्ट होईल,