• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

‘संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती’ ग्रंथाचा २३ रोजी नाथषष्ठीला प्रकाशन सोहळा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 21, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
‘संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती’ ग्रंथाचा २३ रोजी नाथषष्ठीला प्रकाशन सोहळा
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ : प्रतिनिधी 

संत एकनाथ महाराजांनी आपल्या अभंगातून केलेली भक्ती आणि भारूडातून केलेले समाजप्रबोधन यावर पीएच.डी. पदवी मिळवल्यानंतर डॉ. जगदीश पाटील आपल्या प्रबंधाला ग्रंथरूप देत आहेत. दरम्यान श्री एकनाथ षष्ठीचे औचित्य साधून ‘संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
भुसावळ येथील रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणेचे मराठी भाषा अभ्यास गट सदस्य डॉ. जगदीश पाटील यांना २०१२ मध्ये ‘संत एकनाथ अभंगगाथा : भक्ती विचार’ या विषयावर प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावतर्फे पीएच.डी. ही पदवी प्रदान करण्यात आली होती. या प्रबंधाचे ग्रंथरूप व्हावे या उद्देशाने श्री संत एकनाथ महाराजांचा जलसमाधी दिन श्री एकनाथ षष्ठीचे औचित्य साधून ‘संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती’ हा ग्रंथ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या ग्रंथाला प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन यांची प्रस्तावना तर प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर नांदेड यांचा अभिप्राय लाभला आहे. प्रकाशकांची भूमिका ह. भ. प. लक्ष्मण महाराज चिखलीकर यांनी स्वीकारली आहे. ग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवार, दि. २३ मार्च २०२२ रोजी दुपारी ४ वाजता फैजपूर येथील सतपंथ मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार असून अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत एकनाथ महाराज यांचे चौदावे वंशज हभप योगिराज महाराज गोसावी आणि नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. पृथ्वीराज तौर उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथातून नवविधाभक्तीचे दर्शन
श्री संत एकनाथांच्या अभंगात असलेल्या नवविधाभक्तीचे दर्शन वाचकांना या ग्रंथाच्या माध्यमातून होऊ शकेल. त्यासाठी या ग्रंथाचे तीन विभाग करण्यात आले आहे. पहिल्या विभागात अंतरीचे व संत एकनाथ महाराज जीवन चरित्र रेखाटण्यात आले आहे. दुसर्‍या विभागात संत एकनाथांनी आपल्या अभंगातून श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन या नऊ मार्गांनी केलेली भक्ती विविध संदर्भ देऊन सोदाहरण स्पष्ट करण्यात आली आहे. मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास जाणून घेऊ इच्छिणाऱ्या, संत साहित्याची गोडी असणाऱ्या व संत साहित्य अभ्यासणाऱ्या वाचकांसाठी हा ग्रंथ निश्चितच लाभदायी ठरणार असल्याचे डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
जळगाव

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group