जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२४
झाडाला गळफास घेवून किरण गडबड सपकाळे (वय २२, रा. श्रीरामनगर) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. हि घटना यावल शहरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जिल्हा परिषदेच्या मागील बाजूला असलेल्या श्रीराम नगरात किरण गरबड सपकाळे या तरूणाने दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास पिंपळाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत किरण सपकाळेच्या मृतदेहावर यावलच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.