जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२४
राज्यातील छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचारासारख्या गंभीर घटना घडत आहे. नुकतेच भिवंडी येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी भाजी देण्यासाठी आरोपी 25 वर्षीय प्रेयसीच्या घरी गेली असता तिच्या 60 वर्षीय प्रियकराशी संगमनत करून त्या पीडित मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी 60 वर्षीय नराधमाला अटक केली आहे. मात्र त्याची 25 वर्षीय प्रेयसी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे. गोपीनाथ गवळी (वय 60) असे अटक नराधमाचे नाव आहे. तर सोनी (वय 25) असे फरार गोपीनाथ याच्या प्रेयसीच नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 35 वर्षीय महिला भिवंडीत राहत असून याच भागात ती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. तर तिची 16 वर्षीय पीडित भाची तिच्यासोबत राहत आहे. विशेष म्हणजे आरोपी गोपीनाथ हा पीडित मुलीचा नातेवाईक असल्याने त्यांची ओळख होती. तर 60 वर्षीय नराधमाचे एका 25 वर्षीय महिला सोनीशी प्रेमसंबंध होते.
जून महिन्यात 2024 महिन्यात पीडित मुलगी आरोपी महिलेच्या घरी भाजी देण्यासाठी गेली होती. त्यावेळी आदीपासूनच घरात आरोपी गोपीनाथ हा एकटाच होता. मुलगी एकटीच घरात आल्याचा फायदा घेत प्रेयसी सोनी हिने पीडित मुलीच्या अंगावरील कपडे काढले तर 60 वर्षीय आरोपी प्रियकराने पीडित मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलगी भयभीत झाल्याने प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यानंतर पीडितेला 2 जून आणि 5 जून रोजी दोघा आरोपींनी रिक्षातून रामनगर भागातील आरोपी महिलेच्या खोलीवर नेऊन तिच्यावर गोपीनाथने पुन्हा बलात्कार केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी काही तासातच अटक केली. त्याला मदत करणारी आरोपी महिला मात्र अद्याप फरार आहे.