
जळगाव मिरर । २० ऑक्टोबर २०२२
रावेर राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे केळीपिक विमा योजनेत मंजूर रक्कम खात्यात न आलेल्या शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली.त्यानंतर तहसील कार्यलयात नायब तहसीलदार श्री संजय तायडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात न पडल्यास ऐन दिवाळीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे माजी जिप सदस्य श्री रमेश नागराज पाटील,पंचायत समिती सदस्य श्री दिपकभाऊ पाटील,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाअध्यक्ष सुनील कोंडे,रावेर शहराध्यक्ष शेख मेहमूद, राष्ट्रवासी युवकचे तालुकाध्यक्ष श्री सचिन पाटील यांसह धीरज भंगाळे,गोपाळ भिरुड, रामभाऊ सोनवणे,रामदास भंगाळे स्वप्नील चौधरी,राहुल राणे,वामन खाचणे, अनिल पाटील, रामकृष्णा सरोदे,गोपाळ चौधरी,आत्माराम पाटील,वैभव चौधरी, यांसह तालुकाभरातून असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.यावेळी संबंधित विमा कंपनी प्रतिनिधीला बोलावून यासंदर्भात त्यांना सूचना देण्यात येईल व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे नायब तहसीलदार श्री तायडे यांनी सांगितले.




















