
जळगाव मिरर । २५ ऑक्टोबर २०२२
दिवाळी सण हा तेजाचे, प्रकाशमानाचे प्रतिक आहे. यासाठी संपूर्ण देश दिपोत्सव बनवत असतांना जळगाव शहरातील प्रभाग क्र. 1 मध्ये काही भाग आजही रस्त्यावर लाईट नसल्याने येथून अंधारात जावे लागत आहे. जळगाव शहराची अवस्था सध्या तरी अशी झालेली आहे की, ज्या ठिकाणी रस्ते आहे तिथे लाईट नाही. जिथे लाईट आहे तिथे रस्ते नाही आणि ज्याठिकाणी रस्ते व लाईट नाही तिथे नगरसेवक चमकलेच नाही. समस्या आहे प्रभाग क्र.1 मधील.
छत्रपती शिवाजी महाराज नगरातून कानळदाकडे जाणाऱ्या लक्ष्मी नगरातील मुख्य रस्त्यावर जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील कामामधून कानळदा फाट्यापर्यंत असणाऱ्या डांबरीकरणचा रस्ता ना.पाटील यांनी मोठ्या मनाने तो जळगाव शहरापर्यंत भिडवून दिला आहे. परंतु जळगाव मनपाची व या प्रभागातील नगरसेवकांची इतकीही मानसिकता नाही की आयत्या मिळालेल्या रस्त्यावर दिवाबत्तीची तरी व्यवस्था करावी ही समस्या आजही कायम आहे. या मुख्य रस्त्यांवर डांबरीकरण उत्तमरित्या झालेले आहे. पण मनपाचा आडमुठे पणामुळे नागरिकांच्या अनेक समस्या इथे उपस्थित होत आहे. दर महिन्याला या मुख्य रस्त्यावर किमान 2 ते 3 गुन्हे घडत आहे. त्याला फक्त कारणीभूत आहे ते म्हणजे दिवाबत्ती येथे कुठलाही उजेड नसल्याने काही समाजकंटक येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना शस्त्र दाखवित लूट होत आहे. याकडे पोलिस प्रशासनही किती लक्ष देणार. या परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी मनपात तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने हेच जीवन जगणे आता नागरिकांनी स्विकारले आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापौर महाजन यांचा दौरा असफल
जळगाव शहराच्या महापौर जयश्रीताई महाजन यांनी काही दिवसाआधी या प्रभागातील समस्याबाबत दौरा केला होता परंतु तो दौरा देखील असफलच म्हणावा लागेल कारण ज्या समस्या महापौर महाजन यांनी पाहिल्या होत्या. त्या आजही जैसे थे म्हणावे लागेल.




















