
जळगाव मिरर । २७ ऑक्टोबर २०२२
जामनेर शहरातील महावीर मार्गावरील एका घरातून तब्बल ४५ हजार रुपये किमतीचा २ मोबाईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील महावीर मार्गावरील परिसरातील रहिवासी हेमंत शांताराम वाणी(४८, व्यवसाय – होटल) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे, दि २६ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घराच्या पहिल्या मजल्यावरून कुणीतरी अनोळखीनी २० हजार रुपये किमतीचा वन प्लस तर २५ हजार रुपये किमतीचा समसंग कंपनीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ साहिल तडवी हे करीत आहेत.




















