• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

फडणवीस यांचा गोप्यस्फोट; शिवसेनेला दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 5, 2022
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
फडणवीस यांचा गोप्यस्फोट; शिवसेनेला दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ५ नोव्हेबर २०२२

राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन पाळलं गेलं नाही, म्हणून आम्ही भाजपसोबतची युती तोडली असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कायम करण्यात येतो. पण नक्की काय घडलं होतं? भाजपनं खरंच शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती का? याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच गौप्यस्फोट केला आहे. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली.

फडणवीस म्हणाले, “आमच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंसमोर दहा वेळा ही घोषणा केली होती की, २०१९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येईल. पंतप्रधानांसह अमित शहा आणि आमच्या सर्व मोठ्या नेत्यांनी ही घोषणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे देखील टाळ्या वाजवत होते. इतकचं नव्हे तर उद्धव ठाकरेंनी स्वतःही घोषणा केली होती. त्यामुळं सर्वांनी मिळून केवळ पंतप्रधानाच नव्हे शिवसेना आणि भाजपनं मिळून मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषीत केलं होतं. पण युती होऊन निकाल समोर आल्यानंतर अचानक त्यांच्या असं लक्षात येतं की, शिवसेनेला मतंच अशी पडलीत की, तीन पक्ष एकत्र आले तर आपला मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळं अचानक उद्धव ठाकरेंनी आपला पवित्रा बदलला”

मुख्यमंत्रीपदाऐवजी दिली पालघरची जागा
“मी हे पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो की, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायचं कधीही ठरलं नव्हतं. मी यापुढं जाऊन काही तथ्य देखील सांगतो. निवडणुकीपूर्वी जेव्हा त्यांनी ही अट ठेवली तेव्हा आम्ही त्यांना स्पष्टपणे नकार देत, ही युती होणार नाही असं सांगत आम्ही बैठकीतून निघून गेलो. त्यानंतर तीन दिवसांनंतर आम्ही पुन्हा एकदा बैठक घेतली आणि मुख्यमंत्रीपदाऐवजी आमची पालघरची जागा उमेदवारासह आम्ही शिवसेनेला दिली, त्यानंतर आमची युती झाली. त्यामुळं हे शंभर टक्के स्पष्ट होतं की, मुख्यमंत्रीपद त्यांना देण्यात येणार नव्हतं”

आम्हाला असं अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद नको
पण आमच्यामध्ये हे नक्की बोलणं झालं होतं की, गेल्यावेळी शिवसेनेला आम्ही कमी मंत्रीपदं दिली होती त्यामुळं यावेळी जास्त मंत्रीपद देऊ. त्यांनी दोन-तीन मंत्रीपदं अधिकची मागितली होती ती सुद्धा त्यांना देण्याचं आम्ही मान्य केलं. पण मुख्यमंत्रीपदाबाबत कधीही आश्वासनं दिलं नव्हतं. जर आम्ही खरंच वचन दिलं असतं तर त्यांना ते देऊ केलं असतं. कारण बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केलं होतं, त्याप्रमाणं त्यांच्याकडे कमी जागा असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळं उद्धव ठाकरे आत्ता जे ते बोलत आहेत की, त्यावेळी आमच्यासोबत असते तर आज अडीच वर्षे तसेही तुम्हाला मिळाले असते. पण आम्हाला असे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद नकोच. बेईमानीनं अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घेण्याऐवजी ते आम्ही आमच्या ताकदीवर घेऊ, असे काही खुलासेही यावेळी फडणवीसांनी या कार्यक्रमात केले.

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group