
जळगाव मिरर । ९ नोव्हेबर २०२२
राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलेबद्दल केलेल्या बेताल वक्तव्य आता त्यांचा चांगलेच भोवणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीने राज्यभर आंदोलन केल्यानंतर आता एका महिला पदाधिकारयांनी थेट बक्षीस जाहीर केले आहे. कि जो मंत्री अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडेल त्यांना १० लाख रुपये दिले जातील असे आवाहनच केल्या येणाऱ्या काळातील राजकारण राष्ट्रवादी व शिंदे गटात तापण्याची दाट शक्यता जाणवत आहे. जालना येथील राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा रेखा तौर यांनी ही घोषणा केलीय.
शिंदे गटावर ‘पन्नास खोके’ असा सतत होत असलेल्या आरोपाला उत्तर देतांना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत टीका केली होती. सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. अब्दुल सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील घरासमोर आंदोलन करत त्यांच्या घराची तोडफोड देखील करण्यात आली. त्यातच आता जालना येथील राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा तौर यांनी अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सत्तार आणि राष्ट्रवादीमधील वाद आणखीनच वाढतांना पाहायला मिळतोय.
यावर बोलतांना राष्ट्रवादीच्या नेत्या रेखा तौर म्हणाल्यात की, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा निषेध केला पाहिजे. फक्त सुप्रिया सुळे यांचाच नाही तर राज्यातील सर्वच महिलांचा सत्तार यांनी अपमान केला आहे. सुप्रिया सुळे या अब्दुल सत्तार यांच्या सात पिढ्या विकत घेऊ शकतात. तर अब्दुल सत्तार महाराष्ट्रात जिथे दौऱ्यावर असतील तेथील तिथे त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कपडे फाडावे आणि कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस माझ्याकडून देण्यात येईल असे रेखा तौर म्हणाल्यात.





















