
जळगाव मिरर । १० नोव्हेबर २०२२
महाराष्ट्रातील कामगाराच्या प्रश्नावर कामगारामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने 6 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या काळामध्ये चेतना मजदूर यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरची यात्रा शिवनेरी किल्ल्यांवरून सुरू होईल आणि दोन विभागात महाराष्ट्राच्या 21 जिल्हे व 125 तालुक्यातून या यात्रेचा प्रवास असेल.
महाराष्ट्रातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा बाधकाम व घरेलू कामगारांसाठी ज्या योजना आहेत. त्यांची अमलबजावणी बंद आहे ती सुरु करा, किमान वेतन, बोनस, पगार वाढ, कामावरून कमी करणे याबाबत संघटना व कामगारानी केलेल्या तक्रारीवर वर्ष वर्ष निर्णय होत नाहीत ती पूर्ववत सुरू करा, ओरिसा व हरियाणा राज्या प्रमाणे कंत्राटी कामगारांना कायम करण्याबाबत निर्णय घ्या, अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवा यासह विविध कामगारांच्या समस्या घेऊन कामगारामध्ये जागरुकता निर्माण करणे हा यात्रेचा हेतू आहे. राज्यातील ४९ लाख कामगारांकडून कामगार राज्य विमा योजनेसाठी सर्वाधिक वर्गणी जाते. मात्र या योजनेची अंमलबजावणी राज्यात नीट होत नाही याबाबत सरकारचे लक्ष वेधणे आणि ती करून घेणे यासाठी जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने प्रत्यक्ष संपर्क, सभा, बैठका, मेळावे असे कार्यक्रम संपन्न होतील. या यात्रेचा शेवट 21 डिसेंबर 2022 रोजी आझाद मैदान येथे हजारो कामगारांच्या मोर्चाने होईल. त्याबाबत सरकारला सूचना व मागणी पत्र सादर करण्यात आलेले आहे.
ही यात्रा शिवनेरी वरून सुरू होऊन पुणे पुढे पश्चिम महाराष्ट्र कोकण मार्गे ठाणे येथे समारोप होईल. तर दुसरी यात्रा पुणे नाशिक उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मार्गे नगरला या यात्रेचा समारोप होईल. या बार दिवसाच्या काळात यात्रेत अनिल दुमणे प्रदेश अध्यक्ष मोहन येणुरे प्रदेश महामंत्री श्रीपाद कुटासकर प्रदेश संघटनमंत्री जिल्हा सेक्रेटरी सचिन लाडवंजारी यांच्यासह वीस प्रदेश पदाधिकारी व विविध उद्योगांचे प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रभर या यात्रेत सहभागी होणार आहेत.




















