
जळगाव मिरर । ९ डिसेंबर २०२२
शहरातून तरुणीसोबत लग्न करण्यासाठी तिला गुंगीचे औषध देवून तीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीला अहमदनगर येथे नेवून तीला एका खोलीस देखील डांबून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी 12 जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा येथे 20 वर्षीय तरूणी ही कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वी तरूणीला लग्नासाठी अहमदनगर येथील स्थळ आले होते. परंतु मुलगा नात्याने तरुणीचा मामा लागत असल्याने तिच्या कुटुंबियांनी ते स्थळ नाकारले होते. त्यानंतर नागपूर येथील एका मुलासोबत तरुणीचा साखरपूडा झाल्याने त्यांच्या लग्नाची तयार सुरु होती. दि. 8 जून रोजी सकाळी 5.15 वाजता तरूणी श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानावर मॉर्निंक वॉक करण्यासाठी आली असता, याठिकाणी ईश्वर राणा, पल्लवी राणा, सुरज किलोलिया हे एका कारमधून तेथे आले.
आम्ही तुमच्या घरी जात आहोत, तु गाडीत बस असे त्यांनी तरुणीला सांगितले. तिघे ओळखीचे असल्यामुळे तरूणी त्यांच्या कारमध्ये बसली. परंतु कार तरुणीच्या घराकडे न जाता ती अजिंठा चौफुलीकडे निघाली. याचवेळी तरुणीला तिघांनी गुंगीचे औषध पाजल्यामुळे तरुणी बेशुद्ध पडली. ज्यावेळी तरुणीला शुद्ध आली त्यावेळी तरुणीला तिघांनी मारहाण करुन तिला बुरखा घालण्यास भाग पाडले. त्यानंतर कारही सरळ अहमदनगर येथील न्यायालयात नेण्यात आली. तेथे सागर राणा व शिवम राणा उपस्थित होते. त्यांनी एका कागदावर तरूणीची बळजबरीने सही घेतली.




















