अमळनेर : विक्की उत्तम जाधव
महाराष्ट्राला मोठी धार्मिकतेची परंपरा आहे. तर पंढरपूर येथे लाखो भाविक आषाढी यात्रेसाठी जात असता. यासाठी राज्य सरकार देखील या भाविकांना मोठी मदत करीत बससेवेसह रेल्वेसेवेचा लाभ देत असतात. यात आता अमळनेर आगारातून देखील पंढरपूर जाण्यासाठी शेकडो भाविकांना बस उपलब्ध होणार आहे.
अमळनेर आगारातून ह.भ.प.प्रसाद महाराज यांच्या प्रेरणेने पंढरपूर ला जाणाऱ्या वारकरी भाविकांसाठी आषाढी यात्रे निमित्त पंढरपूर साठी जादा बस दिनांक १३ जूनपासून सोडण्यात येणार आहे. सदर बस ही दररोज सकाळी आठ वाजता अमळनेर येथून निघेल व पंढरपूर येथून देखील सकाळी आठ वाजता निघेल तरी भाविकांनी सदर बस सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन देखील करण्यात आले आहे.





















