जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२३ | मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अनेक जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांचे देखील उपोषण मोठ्या ताकदीनिशी सुरु आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची टिपण्णी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यात हजारो नागरिकांचा मॉब घुसला असून दगडफेक करीत वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली आहे हि घटना सोमवारी घडली आहे.
मराठा समाजाला आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटी यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सुरुवातीला जिल्ह्यात साखळी उपोषणे झाली. मात्र, मागच्या दोन दिवसांत आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बसची जाळपोळ, अचानक रास्ता रोको, असे प्रकार होत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल हिनवणी करणाऱ्या वक्तव्याची कथीत ऑडीओ क्लीप समोर आली. यावरुन मराठा आंदोलक आक्रमक झाले.
सोवमारी त्यांच्या माजलगावच्या बंगल्यासमोर हजारोंची गर्दी जमली. सुरुवातीला बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. यात बंगल्याच्या सगळ्या काचा फुटल्या. त्यानंतर आंदोलकांनी गेट उघडून आतमध्ये घुसून चारचाकी वाहनांना आग लावली. आगीनंतर बंगल्यातून ज्वाला आणि धुरांचे लोट बाहेर निघत होते. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या अग्नीशमन वाहनाचीही आंदोलकांनी तोडफोड केली.