जळगाव मिरर | २४ जानेवारी २०२४
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु असून गेल्या ३ दिवस पुणे शहर “जरांगेमय” झाले असून रांजणगावते पुणे दरम्यान ४० किमी अंतरात जरांगे यांच्या स्वागताचे ९५०० हून अधिक फलक, तसेच रस्त्याच्या दुतर्फा, झाडांवर, घरांवर आणि दुकानांवर ४०,००० हून अधिक भगवे झेंडे लावले आहेत. आंदाेलकांनी डोक्यावर “मीही जरांगे” लिहिलेली गांधी टोपी आणि टी-शर्ट घातलेले आहेत. जरांगेंवर तयार केलेली १५० हून अधिक गाणी आंदोलकांचा उत्साह वाढवत आहेत.
मराठा आरक्षणासाठी २० जानेवारी रोजीअांतरवाली सराटीतून मुंबईला निघालेले मनोज जरांगे यांचा मोर्चा सोमवारी मध्यरात्री रांजणगाव एमआयडीसीत पोहोचला. मंगळवारी सकाळी ९:३० वाजता त्यांनी पुढील प्रवास सुरू केला. त्यांच्यासोबत सेल्फीघेण्यासाठी तरुणांच्या रांगा लागतात. महिलात्यांचे औक्षण करण्यासाठी ४-५ तास प्रतीक्षाकरतात. जरांगेंवर १५० गाणी-मोर्चामध्ये पारंपरिक गाण्यांऐवजी खास जरांगे पाटलांवर तयार करण्यात आलेली गाणी वाजत आहेत.
बीड जिल्ह्यातल्या गेवराईच्या भणंगवाडीचे-आला बघा मराठ्याचा वाघ आला, बघू कोण अडवतो याला, मादळमोही बीडचे-तुम्ही कोठेही टाका खटला, आता मर्द मराठा पेटला, सौंदनवाडी हिंगोलीचे-आले किती गेले किती शंभर, जरांगे पाटील एक नंबर,परभणीचे-आली तलवारीला धार, जरांगे करणार यांना हद्दपार अशा १५० हून अधिक गाण्यांवर तरुणाई थिरकत आहे.
मंगळवारी ९:३० वाजता जरांगे पाटील घराबाहेर आले. रांजणगाव तेखराडी बायपास हे ४० किमीचे अंतर कापण्यासाठी त्यांना पूर्ण दिवस लागला. सोमवारीही त्यांनी रांजणगाव एमआयडीसीतील मैदानावर रात्री २:३० ते ३:३० दरम्यान सभा घेतली. एकूणात मंगळवारी त्यांचे वेळापत्रक कोलमडले होते.
कार्ला येथील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगेंचा पूर्णाकृती मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे. जरांगे २४ जानेवारीरोजी लोणावळा भागात वाकसई चाळ येथे मुक्कामी येणार आहेत. तेथे त्यांची सभाही होणार आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान शेजारी असलेल्या १३० एकरमोकळ्या जागेत नियोजन हाती घेण्यात आले आहे. १० ते १५जेसीबीने हा परिसर स्वच्छ केला जात आहे.