
जळगाव मिरर | ५ एप्रिल २०२४
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे शहरात ‘भिमविचारोत्सव’ या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानुसार दि. १० ते दि.१४ एप्रिल दरम्यान कार्यक्रमांचे आयोजन केले अशी माहिती समितीचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे पत्रकार परिषदेत पार पडली. यावेळी पुढे बोलतांना संजय शिरसाठ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वापर्यंत पोहचविण्यासाठी विविध कार्यक्रम महोत्सव समितीतर्फे घेण्यात आले आहे. यात दि. १० रोजी काव्य प्रबोधन कवी अनंत राऊत करणार आहे. दि. ११ रोजी महिलांची दुचाकी रॅली काव्यरत्नावली चौक ते ज्योतीबा फुले पुतळा अशी रॅली असेल. सायंकाळी ७ वाजता फुले मार्केट येथे प्रा. मिनाक्षी कांबळे यांचा एकपात्री नाट्य प्रयोग यांनी केले. तर रात्री साडेआठला हभप माईसाहेब पाटील यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. दि. १२ रोजी सरदार वल्लभाई पटेल सभागृहात सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी खुली वकृत्व स्पर्धा होणार आहे. तर दि. १३ रोजी गणेश कॉलनी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धा होणार आहे.
तर रात्री आठ वाजता रेल्वे स्टेशन येथे लाईव्ह म्युझीक व लाईटींग शो असणार आहे. रविवार दि. १४ रोजी सकाळी आठ वाजता रेल्वे स्थानक येथे अभिवादन सभा होईल. तर सायंकाळी सायंकाळी सात पासून शहरातील सर्व जयंती मिरवणूकीचे स्वागत हे उत्सव समितीतर्फे केले आहे. यावेळी उत्सव समितीचे कार्याध्यक्ष विजय सुरवाडे, सचिव आशिष सपकाळे, उपाध्यक्ष भारती रंधे, गणेश पगारे, खजिनदार नितीन मोरे, सहसचिव निलु इंगळे, सुवर्णा तायडे, सुजाता ठाकुर, सल्लागार समितीमधील मुकुंद सपकाळे, सतिश गायकवाड, अनिल अडकमोल, दिलीप सपकाळे, हरीशचंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.




















