
जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२४
दि.१२ एप्रिल शुक्रवार रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृह या ठिकाणी राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती याठिकाणी जळगांव जिल्हयात तूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत शिव,फुले,शाहू,आंबेडकर विचारांच्या विषयावर एकूण ४५ विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व विचार नोंदविले.
यावेळी प्रथम ,द्वितीय व तृतीय असे एकूण तीन पारितोषिक जयंती उत्सव समिती तर्फे घोषित करण्यात आले होते त्यापैकी प्रथम क्रमांक 11000रू धर्मेश हिरे,धुळे या विद्यार्थ्याने पटकाविले तर द्वितीय पारितोषिक 7000 रू यश पाटील,मुंबई व तृतीय पारितोषिक 5000 रू दोन विभागात प्रत्येकी तनिष्का साळवे भुसावळ व निर्भय सोनार नाशिक यांनी पटकाविले तसेच या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले.
या स्पर्धसाठी निरीक्षक म्हणून प्रा.बापू पानपाटील सर, डॉ दीपक शिरसाठ सर, व प्रा.हर्षल पाटील सर यांनी काम पाहिले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संपूर्ण नियोजन प्रा. डॉ प्रकाश कांबळे सर यांनी केले या वेळी प्रमुख उपस्थतीमध्ये प्रा.डॉ.सत्यजित साळवे,मा. सुमित्र अहिरे सर, सतिशभाऊ गायकवाड,राहुल भालेराव, राजूभाऊ खरे हे उपास्थित होते तसेच उत्सव समितीचे मा. राधे भाऊ शिरसाठ, अशिष सपकाळे, नितिन मोरे, गणेश पगारे, भारती रंधे, नीलूताई इंगळे,संगीता मोरे, साळवे मॅडम,गोपाळ डोंगरे,सागर भालेराव,पंकज सोनवणे,नितीन अहिरे,गोपाळ बैसाने, जितू सोनवणे हे उपास्थित होते कार्यक्रम यशस्वितेसाठी समितीचे कार्याध्यक्ष विजय सुरवाडे यांनी परिश्रम घेतले.




















