
जळगाव मिरर | ६ जून २०२४
दि ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युथ फॉर नेचर कंसर्वेशन फाउंडेशन जळगाव व यावल वनविभाग जळगाव यांचे संयुक विद्यमाने जळगाव येथील काव्यरत्नावली चौकात रोपे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
आपल्या जळगावात उन्हाळ्यातील तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे.शहरातील ज्या जबाबदार नागरिकांकडे झाड लावण्यासाठी जागा आहे त्यांनी प्रत्येकी एक झाड लावून ते वाढवले तर थेट लाखो झाडे वाढतील आणि पुढच्या उन्हाळ्यात आपल्या जळगाव चे तापमान कमी होण्यास मदत होईल व पाऊस सुद्धा जास्त होईल असे आवाहन यावेळी युथ फॉर नेचर कंसर्वेशन जळगाव संस्थेतर्फे करण्यात आले.
यावेळी वड,पिंपळ ,उंबर सीताफळ,चिंच,आवळा, रामफळ,कडुनिंब,जांभूळ,बेहडा,बेल,लिंबू,शेवगा अश्या विविध पाच हजार रोपांचे वाटप करण्यात आले व नागरिकांना संस्थे तर्फे राबवण्यात येणाऱ्या ट्री बँक,सीड बॉल कार्यशाळा, जलसंधारण या विविध उपक्रमांची माहिती देऊन त्यांना दिलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी शपथपत्र लिहून घेण्यात आले.
या कार्यक्रमाला यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री जमीर शेख,सहाय्यक वनसंरक्षक श्री प्रथमेश हाडपे, यावल पूर्व चे आरएफओ श्री स्वप्नील फटांगरे, यावल पश्चिम चे आरएफओ श्री सुनील भिलावे यांचेसह युथ फॉर नेचर कंसर्वेशन संस्थेचे बालेश कोतवाल,गिरीश नारखेडे,रणजित पाटील,हर्षल नारखेडे,अमित नारखेडे,सोहम खडके,वैभव भोळे, युवराज बारी,डॉ श्रुती कोतवाल,सौ भाग्यश्री पाटील ,सौ गुंजन नारखेडे, रोहित बडगुजर संस्थेचे स्वयंसेवक उपस्थित होते.





















