• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात एआयसीटीई “आयडिया लॅब”चे उद्घाटन

महाविद्यालयाकडून लॅबच्या उभारणीसाठी तब्बल १ कोटी रुपयांची गुंतवणूक ; उत्तर महाराष्ट्रातून एकमेव “जी.एच.रायसोनी”ला एआयसीटीई-आयडिया लॅबची मान्यता, विध्यार्थ्यांच्या कल्पनांना वास्तव रूप मिळण्याचे व्यासपीठ उपलब्ध

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 24, 2024
in जळगाव
0
धमकी देणाऱ्या जोर्वेकर ला अटक करा, त्याला प्रोत्साहन देणाऱ्या माजी खासदार माजी आमदारांवर गुन्हा दाखल करा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जून २०२४

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय येथे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) ने मंजूर केलेल्या व युवक विध्यार्थ्यांना संशोधनाचे प्रेरणास्तोत्र ठरलेल्या “एआयसीटीई आयडिया लॅब”चे सोयो सिस्टम्स प्रा. लि.चे संचालक किशोर ढाके, जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विध्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत ता.२४ सोमवार रोजी दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आयडिया लॅबच्या स्थापनेसाठी देशभरातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी अर्ज केले होते, त्यापैकी काही निवडक महाविद्यालयांची निवड करण्यात आली होती. यापैकी एआयसीटीईने उत्तर महाराष्ट्रातून एकमेव जळगाव येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाची निवड केली आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दूरदृष्टी, सर्वांना उच्च गुणवत्तेचे स्कीलबेस शिक्षण उपलब्ध करून देणे व त्याद्वारे शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यास उपयोगी पडत नाही. त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी स्वता हाताळून वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो. राष्ट्रीय व राज्य पातळीवर याची चांगली दखल घेऊन सरकारने देशातील शिक्षण संस्थांमध्ये प्रयोगशीलतेला व नवनिर्मितीला चालना मिळावी आणि त्याद्वारे विविध सामाजिक समस्यांवर उपाययोजना करता यावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आयडिया लॅब’ या उपक्रमाला आता कुशल प्रशिक्षणाची जोड देण्याचे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ठरविले आहे त्याचाच भाग म्हणून रायसोनी महाविद्यालयामध्ये प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता मिळाली असून उत्तर महाराष्ट्रातून एकमेव रायसोनी महाविद्यालयाचा या प्रकल्पात समावेश असल्याने अभिमान आहे तसेच या लॅबच्या उभारणीसाठी लागणार्या अद्यावत उपकरणासाठी तब्बल १ कोटी रुपयांची गुंतवणूक स्वता: जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने केली असून विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी व उद्योगक्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी हि प्रयोगशाळा नाविन्यपूर्ण मानसिकता असणा-या विद्यार्थ्यांसाठी सातही दिवस २४ तास खुली राहील असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर उपस्थित संशोधक युवा अभियंते, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना संबोधित करताना कार्यक्रमाचे उद्घाटक किशोर ढाके यांनी म्हटले कि, गरज हि शोधाची जननी आहे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी समाजातील छोट्या छोट्या गरजांवर संशोधन करून ती गरज पूर्ण करण्याचा प्रयन्त केला पाहिजे. निसर्गातील प्रत्येक बदल तुम्हाला संशोधनाची प्रेरणा देत असतो त्याचा नीट अभ्यास करा आणि आयडिया लॅब सारख्या तांत्रिक दृष्टया प्रगत अशा सर्व यंत्रांचा वापर करून नाविन्याच्या निर्मितीचा अनुभव घ्या अपयश आले तरी यातूनच तुम्ही शिकाल. जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा हा प्रयन्त खरंच अभिनंदनास्पद आहे काळाची गरज ओळखून फक्त अभियंत्याला नोकरी करायला न लावता त्यांना संशोधन आणि उद्योजकता या दोन क्षेत्रात कसे यशस्वी होता येईल यासाठी आयडिया लॅब हा इतर शैक्षणिक संस्थांच्यासाठी आदर्श उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

यानंतर कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनात अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी सांगितले कि विद्यार्थ्यांमध्ये संशोधन कौशल्ये निर्माण व्हावीत म्हणून आयडिया लॅबचा वापर करता येईल असे विषय आणि प्रॅक्टिकल्स अभ्यासक्रमात समाविष्ट केली असून या सर्व आधुनिक साधनांच्या वापराचे प्रशिक्षण आयडिया लॅब मधून विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हि लॅब चोवीस तास वापरासाठी उपलब्ध असणार आहे. तसेच आयडिया लॅबसाठी आधुनिक यंत्रे आणि संशोधनासाठी लागणारे थ्रीडी प्रिंटर, लेजर कटिंग मशीन, व्हर्टिकल मशिनिंग सेंटर्स, रोबोटिक आर्म्स, थ्री डी स्कॅनर, सी एन सी वूड राउटर, पीसीबी मिलिंग मशीन आणि ड्रोनसह इतर अनेक यंत्रसामुग्री असलेल्या या प्रयोगशाळेत विद्यार्थी त्यांच्या कल्पनांना प्रॉडक्ट प्रोटोटाईपमध्ये रुपांतरीत करण्यात प्रयत्न करतील. या लॅबमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रात्यक्षिकांची जोड मिळून आधुनिक उपकरणे विद्यार्थ्यांच्या हाताशी सहज उपलब्ध होतील असे त्यांनी यावेळी नमूद केले. या एआयसीटीई आयडिया लॅबसाठी मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. मुकुंद पाटील व इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा.डॉ. तुषार पाटील यांनी सहकार्य केले. या लॅबला मिळालेल्या मान्यतेमुळे विद्यार्थी, पालक व उद्योगविश्वामधून जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी, संचालक श्री.श्रेयसजी रायसोनी यांनी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या परिश्रमाचे कौतुक करुन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: G H Raisoni Collegeidea lab

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group