
जळगाव मिरर | २९ जून २०२४
पत्रकारांच्या हितसंरक्षणासाठी आणि पत्रकारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ संघटनेचे जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष म्हणून युवा पत्रकार परेश सुरेखा प्रमोद बऱ्हाटे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे.व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार संदीप काळे, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांच्या संमतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके यांनी ही निवड जाहीर केली.
माजी माहिती आयुक्त व्ही.डी. पाटील,माजी महापौर जयश्री महाजन,व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल,ग्रामगौरव फौंडेशनचे विवेक ठाकरे,विभागीय अध्यक्ष डीगंबर महाले,संघटनेच्या उर्दू विंग्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी,शासनमान्य अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार रवींद्रशेठ नवाल, छगनसिंग पाटील,मनोज मानकरे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे, ग्रामगौरव फौंडेशनच्या समन्वयक धनश्री ठाकरे आदिनी परेश बऱ्हाटे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.





















