
जळगाव मिरर | १ जुलै २०२४
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील चाळीसगाव बस स्थानकातून ३ लाख ५० हजार रुपये किमतीची बॅग हरवली होती. चाळीसगाव शहर पोलीस व पोलीस पाटील यांच्या मदतीने आरोपीला दोन तासात अटक केले.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील प्रदीप नारायण भोसले हे शनिवारी (दि.२९) चाळीसगाव बस स्थानकवर आले होते. यावेळी बसस्थानकावरून अज्ञाताने त्यांची बॅग पळवली. या बॅगेत सहा हजार दोनशे रुपये रोख, एक मोबाईल, सोन्याचे मंगळसुत्र असा अंदाजे तीन लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल होता. आपली बॅग चोरट्याने पळवल्याची बाब निदर्शनास येताच भोसले यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पंकज पाटील, अजय पाटील, निलेश पाटील, अमोल भोसले, नंदकिशोर महाजन, विनोद खैरनार, मोहन सुर्यवशी, विजय महाजन यांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोकॉ ईश्वर पाटील, पोकॉ गौरव पाटील यांनी दिलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे बॅगेतील मोबाईलचे लोकेशन चाळीसगाव तालुक्यातील शिरगाव येथे दाखविले. त्यानंतर पोलीस पाटील शिरसगाव संदीप निकम व गणेश चव्हाण यांच्या मदतीने ही बँग पोलिसांनी हस्तगत करत दोन तासांतच पोलिसांनी या चोरीचा छडा लावला.





















