
जळगाव मिरर | ५ जुलै २०२४
जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेच्या विनयभंगाच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका साडेतीन वर्षीय चिमुकलीसोबत एका शाळेच्या बाहेर स्कूल व्हॅनमध्ये अश्लिल कृत्य करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दि.१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास भुसावळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी गुरूवार ४ जुलै रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात स्कूल व्हॅनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुकयातील एका गावात साडेतीन वर्षीय चिमुकली ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. चिमुकली ही भुसावळ शहरातील एका शाळेत असतांना १ जुलै रोजी स्कूल व्हॅननचा चालक प्रसाद हिरासिंग चौधरी याने दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास चिमुकली व्हॅनमध्ये बसलेली असतांना त्याने चिमुकलीच्या गुप्तांगाला हात लावून दुखापत करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार चिमुकलीने तिच्या आईला सांगितली. पिडीत मुलीच्या आईने गुरूवारी ४ जुलै रोजी दुपारी सव्वा तीन वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्कूल व्हॅन चालक प्रसाद हिरासिंग चौधरी याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे हे करीत आहे.





















