
जळगाव मिरर | ७ जुलै २०२४
भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ५ जुलैला रात्री ११ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील राहणारी तरुणीही भुसावळ तालुक्यातील एका गावातील शिवारात आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. ती दिव्यांग व अल्पवयीन असल्याचा फायदा घेत भुसावळ येथील गोपाल भिमसिंग बारेला याने पीडित अल्पवयीन मुलीवर ९ जून रोजी अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भुसावळ तालुका पोलिस ठाणे गाठले. ५ जुलै रोजी रात्री ११ वाजता पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गोपाल बारेला याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप करत आहेत.





















