
जळगाव मिरर | ७ जुलै २०२४
सैन्य दलात जवानाचे कुटुंबिय कामानिमित्ताने मुंबईला जाण्यासाठी निघाले. त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमाास चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारला. त्याठिकाणाहून सुमारे २ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना दि. ४ जुलै रोजी तळेले कॉलनीत घडली. याप्रकरणी शुक्रवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तळेले कॉलनीत निखील महाजन हे वास्तव्यास असून ते सैन्य दलात जवान म्हणून नोकरीस आहे. याठिकाणी ते पत्नी हेमांगी, दीर अक्षय महाजन व आई असे हे सध्या या घरात वास्तव्याला आहे. महाजन कुटूंबीय – दि. ४ जुलै रोजी सकाळी कामानिमित्त मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात व पेटीत ठेवलेली १ लाख १० हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची पोत, ३० हजार रुपये किमतीची पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३ हजार रुपये किमतीचे एक ग्रॅमचे लहान बाळाचे सोन्याचे पताका, आणखी एक ३० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, १८ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅमचे सोन्याचे कानातील अभूषण, २ ग्रॅम वजनाचे कानातील अभूषण व ६० हजार रुपये रोख असा २ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
घरात चोरी झाल्याची घटना महाजन कुटुंबियांना दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास समजली. घटनेची माहिती मिळताच महाजन कुटूंबियांनी जळगाववव गाठले. घरात पाहणी केल्यानंतर त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार भा.न्या.स. कलम ३३१ (४) ल ३०५ (ए) गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक नितीन पाटील करीत आहेत.





















