
जळगाव मिरर | ८ जुलै २०२४
महावितरण कंपनीमध्ये गेल्या सहा वर्षापासून कंत्राटी वायरमन म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या ३२ वर्षीय वायरमनचा दि. ६ रोजी संध्याकाळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली आहे.
पारोळा पोलिसात सुनील भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वामीनारायण नगर मधील रहिवाशी श्यामकांत बाबुराव भामरे यांचे चिरंजीव दिनेश शामकांत भामरे (वय ३२) हा गेल्यास सहा वर्षापासून कंत्राटी वायरमन म्हणून काम करत होता. दि. ६ रोजी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास दिनेश भामरे हा म्हसवे गावाच्या पुढे नगाव रोडालगत असलेले इलेक्ट्रिक पोलवर काम करीत असतांना त्यास विजेचा शॉक लागला आहे, असे कळाल्याने नातेकांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन दुसऱ्या वायरमनच्या मदतीने त्यास पोलवरून खाली उतरवले. त्यानंतर दिनेश भामरे यास कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी रात्री दहा वाजता तपासून मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





















