• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्या टप्प्यात 25 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार- आ.अनिल पाटील !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 12, 2025
in राज्य, प्रशासन
0
शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्या टप्प्यात 25 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार- आ.अनिल पाटील !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२५

निम्न तापी पाडळसरे धरणावरील शासकीय उपसा सिंचन योजनेमुळे पहिल्याच टप्प्यात 25 हजार हेक्टर म्हणजेच सुमारे 70 ते 75 हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असून दुसऱ्या टप्प्यात हा आकडा दुपटीने वाढलेला असेल, यामुळे शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावणार आहे. मी काम करणारा माणूस असल्याने काम करूनच दाखवीत असून येणाऱ्या काळात योजना कार्यान्वित झाल्यानंतर शेतकरी भाकरीत आपला चेहरा बघतील असेच काम झालेले दिसेल अशी भावना माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केली.

शासकीय उपसा सिंचन योजना 3 व 4 चे भूमिपूजन गांधली येथे आमदार पाटील यांच्या हस्ते व खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधली जवळ सप्तश्रृंगी मंदिर समोर करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की गेल्या पाच वर्षात मी पाडळसरे धरण सुप्रमा, महसूल ची नवीन प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत, बस स्टँड नुतनीकरण, ग्रामीण रुग्णालय चे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर, शहरातील विविध रस्ते, शहरात 200 कोटीची 24 बाय 7 (दररोज पाणीपुरवठा) नवीन पाणीपुरवठा योजना एवढी कामे मार्गी लावली असून या योजनेचे 27 कि.मी पाईप लाईन टाकण्याचे कामही सुरू आहे. त्यासाठी रस्त्यांची कामे थांबवली आहेत. खरे पाहता येणाऱ्या काळात पाण्यासाठी युद्ध होतील अशीच परिस्थिती आहे. पूर्वी तामसवाडी व अक्कलपाडा धरणामध्ये आपल्यासाठी पाणी आरक्षण राहू दिले नाही आणि कुणी लोकप्रतिनिधीनी तसे प्रयत्न केलेच नाहीत. आपल्या धरणातील तापी चे 7 टी एमसी पाणी देखील खडसे यांनी त्यांच्याकडे वळवून घेतले. मी खरंच सांगतो, तुम्ही मला निवडून दिले नसते तर हे धरण कधीही झाले नसते, मी भांडलो व पाठपुरावा केला म्हणूनच आता 10 टी.एम.सी चे धरण 17 टी.एम.सी चें झाले आहे. धरण तर होणार मात्र धरणाचे पाणी शेतात पोहोचविण्यासाठी राजस्थान मध्ये असलेली टेक्नॉलॉजी आपण वापरत आहोत. त्यासाठी आवश्यक असलेली चौथी सुप्रमा मिळवली. यात पहिल्या टप्प्यात पाच शासकीय सिंचन योजनांचा समावेश केल्याने शेतकरी बांधवांच्या शेतात बंद पाईपलाईन द्वारे पाणी पोहोचणार आहे. मी गेल्या पाच वर्षात लहान मोठे 110 बंधारे बांधून दाखविल्याने यामुळे वॉटर टेबल वाढणार आहे. येणाऱ्या काळात अमळनेर तालुक्यासाठी अक्कलपाडा धरणामध्ये पाणी आरक्षण करण्याचे प्रयत्न असून यामुळे पांझरा चे पाणी माळन नदी मध्ये पोहोचविता येणार आहे. पुढील दुसऱ्या टप्प्यात सात उपसा योजना आणायच्या असून टप्पा दोनसाठी पाठपुरावा आताच सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास दोन ते अडीच वर्षे लागतील. पुढील काळात धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होईल त्यासाठी खासदार स्मिताताई व आपले प्रयत्न सुरू असल्याचे सांगत रेल्वे आणि उद्योग यासाठीही स्मिताताई व मी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले

आपले धरण 100 टक्के पूर्ण होणार- खा.स्मिता वाघ
खासदार स्मिता वाघ म्हणाले की गेल्या काळात अजित दादांचा गट सरकार मध्ये सहभागी झाला व आपल्या गावाचा कायापालट झाला, जनतेला काम करणारा व संपर्क ठेवणारा माणूस लागतो, आपले भाग्य आहे की धरण होण्याआधीच उपसा सिंचन योजना मार्गी लागताय, हे धरण सर्वासाठी संजीवनी आहे. धरण ची काळजी करू नका ते 100 टक्के पूर्ण होणार आहे, कारण आता सर्व योग जुळून आले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील आपल्या सोबत आहेत. आपले पाडळसरे धरण खाली असल्याने उपसा सिंचन शिवाय पर्याय नव्हता, आता बंद पाईपलाईन मुळे 70 टक्के पाणी शेतात पोहोचेल. भविष्यात काहीही राजकीय घडामोडी होवोत तालुका व विकास म्हणून अनिल दादा व मी एकत्रच काम करू आणि सर्व कामे मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली.

पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी धरणाच्या कामाला खरा वेग अनिल दादानीच दिल्याचे सांगत उपसा सिंचन योजना वरदान ठरणार असल्याचे सांगितले. अमळनेर बाजार समिती सभापती अशोक पाटील यांनी या कामाची इतिहासात नोंद होईल असे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शाखा अभियंता भिकेश भटूरकर, कॉन्ट्रॅक्टर अमेय पोपटराव खरमाटे, कल्पेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी तर आभार शत्रूग्न पाटील यांनी मानले. मंचावर माजी जि प सदस्या सौ जयश्री पाटील, प्रा.सुरेश विक्रम पाटील, यशवंत बैसाने, इंजि.जितेंद्र याज्ञीक,
अमोल बिर्हाड उपस्थित होते.

अशी आहे शासकीय उपसा सिंचन योजना-

निम्न तापी पाडळसे प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, पारोळा व धरणगाव तालुक्यातील टप्पा -१ नुसार २५६५७ हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे, लाभक्षेत्रात एकूण ७४ गावांचा समावेश होतो. सदर प्रकल्प अवर्षण प्रवण क्षेत्रातील आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेत पहिल्या टप्प्यात पाच
शासकीय उपसा सिंचन योजनांचा समावेश झाला आहे. आता भूमिपूजन झालेली उपसा सिंचन योजना क्र. ३ असून ता.अमळनेर प्रकल्पाच्या टप्पा १ मध्ये प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या डाव्या तिरावरील धरणापासुन ९.०० कि.मी. अंतरावर मौजे कलाली, ता. अमळनेर येथे या योजनेचे मुख्य पंपगृह आहे. तसेच ८१६ अश्वशक्ति चे ५ पंप मशीनीच्या मदतीने मोजे कलाली येथून पाणी उचलून ते १६३० मी.मी. व्यासाची व १०.९ किमी. लांबी असलेल्या उर्ध्वगामी नलिका क्र. ५ द्वारे मौजे गांधली येथील वितरण कुंडात सोडून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे अंदाजे ३९१२ हे. क्षेत्रास बारमाही सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

सदरील योजनेच्या लाभक्षेत्रात अमळनेर तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे.व त्याअन्वये ३२५५ गट धारकांना लाभ होणार आहे. सदर उपसा सिंचन योजनेचा अंदाजित खर्च रु.२२९.५२ कोटी आहे. तसेच शासकीय उपसा सिंचन योजना क्र. ४. ता. अमळनेर हि योजना प्रकल्पाच्या टप्पा -१ मध्ये प्रस्तावित आहे. सदरील योजनेचे पंपगृह हे उ.सि.यो. क्र. ३ च्या मौजे गांधली येथील वितरण कुंडावरून सुरुवात होणार आहे. तसेच ८८० अश्व शक्ति चे ४ पंप मशीनीच्या मदतीने मौजे गांधली येथील वितरण कुंडावरून पाणी उचलून ते १२६६ मी.मी. व्यासाची व १६.६ किमी लांबी असलेल्या उर्ध्वगामी नलिका क्र. ६ द्वारे मौजे राजवड व पुढे १२३० मिमी. व्यास व ६.३ किमी लांबो असलेल्या ग्राविटी मेन द्वारे मौजे रत्नापिंप्री ता. पारोळा येथील वितरण कुंडात सोडून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे वरील दोघे वितरण कुंड मिळून अंदाजे ५९२१ हे. क्षेत्रास बारमाही सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सदरील योजनेच्या लाभक्षेत्रात अमळनेर तालुक्यातील १०, पारोळा तालुक्यातील ७ व धरणगाव तालुक्यातील १ असे एकूण १८ गावांचा समावेश आहे. व त्याअन्वये ५२१५ गट धारकांना लाभ होणार आहे. सदर उपसा सिंचन योजनेचा अंदाजित खर्च रु.२१७.९७ कोटी आहे.

तसेच शासकीय उपसा सिंचन योजना १ आणि २ चे मुख्य पंप बोहरा येथे राहणार असून दुसरे पंप खेडी येथे असणार आहे. या योजनेचेही काम सुरू झाले असून योजना क्रमांक ५ चोपडा तालुक्यासाठी असणार आहे. अमळनेर तालुक्यातील चारही योजनेचे मेन पाईपलाईन चे काम झाल्यानंतर सर्वत्र सब पाईपलाईन टाकली जाणार आहे

Tags: #jalgaon25 thousand hectares of land will be irrigated in the first phase due to government irrigation scheme - A. Anil Patil!

Related Posts

संतापजनक : आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्येने छत्रपती संभाजी नगर हादरले !
क्राईम

संतापजनक : आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्येने छत्रपती संभाजी नगर हादरले !

June 28, 2025
शेतीच्या बांधाच्या वादावरून परिवारातील 3 जणांचा गेला बळी !
क्राईम

शेतीच्या बांधाच्या वादावरून परिवारातील 3 जणांचा गेला बळी !

June 28, 2025
कौतुकास्पद :  आपण हिंदीत नव्हे तर मराठीतच बोलणार ; मंत्र्यांनी सांगितले ठणकावून !
राज्य

कौतुकास्पद : आपण हिंदीत नव्हे तर मराठीतच बोलणार ; मंत्र्यांनी सांगितले ठणकावून !

June 28, 2025
जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात : जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग
जळगाव

जळगाव कॅरम लिग 2025 ची सुरवात : जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग

June 28, 2025
बापरे : दिव्यांग पतीसह पत्नीला जबर मारहाण तर महिलेचा विनयभंग !
क्राईम

बापरे : दिव्यांग पतीसह पत्नीला जबर मारहाण तर महिलेचा विनयभंग !

June 28, 2025
‘देवा भाऊ तुमच्या पेक्षा गडकरी साहेब बरे ; नेत्यांची पोस्ट व्हायरल !
क्राईम

‘देवा भाऊ तुमच्या पेक्षा गडकरी साहेब बरे ; नेत्यांची पोस्ट व्हायरल !

June 27, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 29, 2025
रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

June 29, 2025

Recent News

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 29, 2025
रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

June 29, 2025

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group