• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

सरकारला मुंडेंची पाठराखण करता येणार नाही ; अंजली दमानिया उद्या देणार पुरावे !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 3, 2025
in राजकीय
0
सरकारला मुंडेंची पाठराखण करता येणार नाही ; अंजली दमानिया उद्या देणार पुरावे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ फेब्रुवारी २०२५

राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरण चांगलेच तापले असतांना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन बीड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात सर्वात मोठा खुलासा करण्याची घोषणा केली आहे. उद्याच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंडेंची पाठराखण करता येणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे अवघ्या राज्याचे डोळे लागले आहेत.

अंजली दमानिया सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की, मी राज्य सरकारला 4 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. या चार दिवसांत सरकारने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची गरज होती. पण सरकारने या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. मी या 4 दिवसांत आणखी पुरावे गोळा केले. उद्या सकाळी 11 वा. पत्रकार परिषद घेऊन मी या पुराव्यांचा खुलासा करेन. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धनंजय मुंडे यांची पाठराखण करता येणार नाही.

मी या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पण धनंजय मुंडे या दोन्ही नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. विशेषतः धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईपर्यंत संतोष देशमुख प्रकरणात न्याय होणार नाही. त्यांच्यासारखे लोक मंत्री म्हणून वाल्मीक कराड व कैलास फड सारख्या लोकांना मोठे करतात. दहशत माजवतात, अत्याचार करतात. त्यामुळे असे लोक आम्हाला मंत्री म्हणून मान्य नाहीत.

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, मी आतापर्यंत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडे यांचा राख घोटाळा, काळा पैसा त्यांच्या खात्यात कसा आला? सरकारी कंपनीचा फायदा एका मंत्र्याला कसा झाला? हे दाखवले. त्यांच्या जमिनी व आर्थिक व्यवहारही दाखवून दिले. पण काहीही झाले नाही. पण उद्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्या भ्रष्टाचाराचा खूप मोठा खुलासा करणार आहे. यंत्रणांचा गैरवापर कशा पद्धतीने केला जातो हे देखील मी सांगणार आहे. विशेषतः हे पुरावे मी भगवानगडावरही पाठवून गडाने धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा मागे घेण्याची विनंती करणार आहे. माझ्या पुराव्यानंतर भगवान गडाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर समस्त महाराष्ट्र गडाला नमन करेल.

नामदेवशास्त्री महाराज खरेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या मागे असतील तर त्यांनी देशमुख कुटुंबीयांना मिळणाऱ्या न्यायाच्या मार्गातील अडचणी दूर कराव्यात. धनंजय मुंडे त्यांच्या मार्गातील सर्वात मोठे विघ्न आहे. ते मंत्रिपदावर असेपर्यंत या प्रकरणात न्याय होणार नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचे काम आता भगवानगडानेच करायला हवे. त्यानंतरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल. माझ्या हाती आलेले सर्व पुरावे अतिशय धक्कादायक आहेत. हे पुरावे जनतेपुढे येतील तेव्हा जनताच सरकारला मोठा निर्णय घेण्यास भाग पाडेल, असे दमानिया म्हणाल्या.

Related Posts

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !
क्राईम

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !
राज्य

महसूलवाढीसह ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यास प्राधान्य द्या ; श्री.राजेंद्र पवार यांचे आवाहन !

May 3, 2026
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !
जळगाव

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत नाराजीचा स्फोट; उमेदवारीवरून शिंदेंसमोर मोठे आव्हान !

April 27, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !
क्राईम

‘लाडकी बहीण’ योजनेत घोटाळा उघड : १२,७५७ भावांनीच घेतला लाभ; कोट्यवधींचा गैरव्यवहार !

April 23, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

May 17, 2026
फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

May 17, 2026
कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !

कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !

May 17, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

महत्त्वाची कामे स्वतः हाताळा आणि गरज भासल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

May 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group