
जळगाव मिरर | २६ मे २०२५
वडिलांनी रागावल्याने आणि चापट मारल्याने १६ वर्षीय मुलगा घरातून निघून गेल्याची घटना जळगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. दुपारी १२ ते १२:३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर, मुलाचा शोध न लागल्याने अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत वडिलांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी, दुपारी एका कारणाने फिर्यादी वडिलांनी १६ वर्षीय मुलाला रागावून एक चापट मारली. याचा राग आल्याने हा मुलगा घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेला. रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी परत आला नाही. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ. प्रदीप हिम्मत हे करीत आहेत.




















