
जळगाव : प्रतिनिधी
बहुचचीत असलेला छत्रपती शिवाजी महाराज नगर उड्डाण पुलाचे नगरसेवक दिलीप पोकळे हे दोन दिवसापासून परिसरातील नागरिकांना आवाहन करीत होती कि आज सोमवारी नागरिकांनी आयुक्त बंगल्याजवळ आपण सर्वानी एकत्र यावे व आपण पुलावरून दुचाकीसाठी पूल सुरु करू असे आवाहन केल्यानंतर नागरिक या पुलाजवळ आले पण ज्यांनी आवाहन केले तेच नसल्याने नागरिकांनी तारांबळ उडाली होती. त्यामुळे पूल आज सुरु होईल कि नाही याबाबत नागरिक संभ्रमात होते.
सविस्तर माहिती अशी कि , शहरातील जिल्हा परिषद जवळील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाचे गेल्या ३ ते ४ वर्षपासून पुलाचे बांधकाम सुरु आहे परंतु आजपर्यंत हे काम सुरूच आहे. याबाबत आज बंडखोर नगरसेवक दिलीप पोकळे यांनी आज पुलाबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता. नागरिकांच्या विरोधामुळे नगरसेवकांना हे आंदोलनच त्याना गुंडाळावे लागले आहे. याठिकाणी परिसरातील नागरिक एकत्र येऊन या पुलाचे उदघाटन कुठलेही राजकीय व्यक्ती करणार नाही तर ज्या युवतीचा या पुलामुळे जीव गेला होता. त्या मयत युवतीच्या परिवाराला उदघाटनाचा हक्क मिळावा अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली. याप्रसंगी भगवान सोनवणे, विजय राठोड, संदीप महाले, विनायक पाटील, विशाल वाघ, योगेश साळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहर पोलीस स्थानकांच्या पोलीस पथकाने बंदोबस्त ठेवला होता.




















