• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 18, 2026
in Uncategorized
0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जून २०२६ 

राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत महायुतीने मतदानापूर्वीच मोठा राजकीय डाव साधत 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उर्वरित 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगली असून राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर-जालना. येथे भाजपचे उमेदवार सुहास शिरसाठ आणि शिवसेना (ठाकरे गट) समर्थित गणेश लोखंडे यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत होत आहे. या मतदारसंघातील निकालाला राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

महायुतीने निवडणुकीपूर्वीच रणनीती आखत सहा जागांवर बिनविरोध विजय मिळवला. त्यामुळे मतदानाच्या आधीच सत्ताधारी आघाडीला मोठा मानसिक फायदा झाला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने उर्वरित जागांवर जोरदार मोर्चेबांधणी केली असून अनेक मतदारसंघांत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे.

अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने महत्त्वाची भूमिका घेत तटस्थ राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शहर काँग्रेसच्या सर्व 17 नगरसेवकांना मतदान प्रक्रियेत सहभागी न होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागातील काँग्रेस नगरसेवकांना कोणताही व्हिप जारी करण्यात आलेला नसल्याने ते स्वतंत्रपणे मतदान करू शकणार आहेत.

नागपूर स्थानिक प्राधिकरण विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. नागपूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर मतदार मतदानाचा हक्क बजावत असून प्रशासनाने आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

सोलापूर विधान परिषद मतदारसंघात करमाळा, माढा आणि कुर्डुवाडी परिसरातील सुमारे 80 मतदारांसाठी मतदान सुरू झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात एकाही मतदाराने हजेरी लावली नसल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, महायुतीच्या सहा उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवत विधान परिषदेत प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघातून भाजपचे अरुण लखाणी, पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे, ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, यवतमाळ मतदारसंघातून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे.

आता उर्वरित 11 जागांवरील मतदानानंतर 22 जून रोजी मतमोजणी होणार असून महायुतीचा विजयाचा सिलसिला कायम राहणार की महाविकास आघाडी पुनरागमन करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणांवरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Posts

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी
Uncategorized

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

August 25, 2026
किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !
Uncategorized

किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !

August 18, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !
Uncategorized

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल
Uncategorized

हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

August 6, 2026
फ्रीजचा स्पर्श ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने ७ वर्षीय पार्थचा दुर्दैवी मृत्यू
Uncategorized

फ्रीजचा स्पर्श ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने ७ वर्षीय पार्थचा दुर्दैवी मृत्यू

July 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

जळगावच्या औद्योगिक विकासाला ‘D+’ धोरणाची बुस्टर डोस; उद्योगमंत्री सामंतांचे तातडीच्या मंजुरीचे आदेश

August 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group