जळगाव मिरर | २१ सप्टेंबर २०२६
‘खिशात काय आहे ते दाखवा’ असे सांगत मोहम्मद बाबू खाटीक (वय ६८, रा. आसोदा, ता. जळगाव) यांनी खिशातून २१ हजार रुपये काढताच ते घेऊन चोरटा पसार झाला. ही घटना दि. १७ सप्टेंबर रोजी नवीन बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील असोदा येथील रहिवासी असलेले मोहम्मद खाटीक हे नवीन बसस्थानक परिसरात असताना तेथे ५५ ते ६० वर्षीय अनोळखी व्यक्ती आला व त्याने ‘तुमच्या खिशात काय आहे, ते दाखवा’, असे म्हणाला. त्या वेळी खाटीक यांनी खिशात असलेले पैसे काढून दाखविले. त्या वेळी अनोळखीने त्यांच्या हाताला झटका देत २१ हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाला. या प्रकरणी मोहम्मद खाटीक यांनी दि. १९ सप्टेंबर रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















